Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Spotify Offer : ॲमेझॉन इंडिया ऑफर करत आहे Free Spotify; जाणून घ्या इत्यंभूत माहिती!

Amazon Spotify Premium Offer

ॲमेझॉन इंडियाने काही लिमिटेड ग्राहकांसाठी Spotify Premium चे सहा महिन्यांचे सब्सक्रिप्शन मोफत देण्याची स्कीम आणली आहे. ॲमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर फक्त खरेदी करून ग्राहकांना ही भन्नाट ऑफर ग्रॅब करायची आहे.

आपली आवडती गाणी आणि अल्बम ऐकणे, नवीन संगीत शोधणे आणि मित्रांची ख्वाईश पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आवडीची प्लेलिस्ट तयार करण्यासाठी Spotify हे एक जबरदस्त माध्यम आहे. Spotifyचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही चार्ज भरावा लागतो. नाहीतर तुम्हाला त्यावर लिमिटेड ॲक्सेस मिळतो. पण आता तुम्ही तुमचे Spotifyचे अकाऊंट अपग्रेड करून अनलिमिटेड गाणी ऐकू शकता, फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता तसेच ही गाणी ऑफलाइन सुद्धा ऐकू शकता. असे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला यातून मिळू शकतात.

Spotify Premium!
एक महिन्यासाठी Spotify Premium फ्री! 

सध्या एका महिन्यासाठी Spotify Premium फ्री आहे. एका महिन्यानंतर मात्र तुम्हाला प्रत्येक महिन्याला 119 रुपये भरून (Spotify Premium Plan) याचा आनंद घ्यावा लागणार आहे. याचे पेमेंट तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने करू शकता. तसेच हे सब्सक्रिप्शन तुम्ही कधीही कॅन्सल करू शकता. ज्यांनी यापूर्वी स्पॉटिफाय प्रीमियमचा आनंद घेतला आहे; त्यांना ही एका महिन्याची फ्री ऑफर मिळणार नाही. याव्यतिरिक्त ॲमेझॉन इंडिया (Amazon India)ने मर्यादित ग्राहकांसाठी Spotify Premium चे सहा महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन आणले आहे.

Spotify Premium चे फ्री सब्सक्रिप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त ॲमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर खरेदी करावी लागणार आहे. Spotify Premium Amazon च्या साईटवर टॅब्लेट, लॅपटॉप, मोबाइल डिव्हाइस, स्पीकर्स, हेडफोन आणि ॲक्सेसरीज सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह विविध प्रकारच्या गोष्टी खरेदी करू शकता. जर तुम्हाला ही ऑफर मिळवायची असेल तर तुम्हाला ॲमेझॉन इंडिया आणि स्पॉटिफाय प्रीमिअमच्या (Amazon Spotify Premium) नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे.


काय आहे ॲमेझॉन इंडियाची Spotify Premium ऑफर!

  1. ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून केलेली इलेक्ट्रिकल वस्तूंचीच खरेदी या ऑफरसाठी आवश्यक आहे. खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तुंची किंमत 5 हजारांपेक्षा जास्त असायला हवी.
  2. ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तुंची किंमत 1 हजारापेक्षा जास्त आणि 5 हजारांपेक्षा कमी असल्यास तीन महिन्यांसाठी कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
  3. Spotify Premium च्या फ्री ट्रायलसाठी साईनअप करण्याऐवजी ग्राहकांनी त्यांचा ईमेल आयडी ऑनलाईन स्टोअरमध्ये रजिस्टर करणे गरजेचे आहे.
  4. या प्लानसोबत तुम्ही प्रत्येक गॅझेटनुसार 10 हजारांपर्यंत गाणी डाऊनलोड करू शकता. ज्याची एका महिन्याची प्राईस 119 रुपये असून ते 5 गॅझेटला सपोर्ट करतात.

ॲमेझॉन इंडियाची Spotify Premium ऑफर किती दिवस असणार!

ॲमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ग्राहक या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. तर 15 डिसेंबर 2022 पर्यंत, या ऑफरसाठी पात्र ठरलेल्या ग्राहकांना Spotify Premiumच्या तीन किंवा सहा महिन्यांच्या फ्री सबस्क्रिप्शनसाठी ग्राहकांच्या ईमेलवर कूपन पाठवले जाणार आहे.