Amazon वर वेळोवेळी लाइव्ह होणारे सेल, ऑफर्स हिट ठरत असतात. घरबसल्या भरभक्कम सवलतीत खरेदी करणे कोण सोडेल? गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने Amazon सेल कधी सुरु होणार याची विचारणा युजर्सकडून वारंवार होत होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
येत्या काही दिवसांत ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल (Amazon Great Freedom Festival) लाइव्ह होणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द कंपनीनेच केली आहे. चला तर जाणून घेऊया, हा सेल कधी सुरु होईल आणि ग्राहकांना कोणकोणत्या वस्तू खरेदी करता येणार आहेत.
Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023
दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ॲमेझॉन स्पेशल सेल आणत असतो. यावर्षी मात्र 15 ऑगस्टपूर्वीच Amazon वर सेल सुरु होणार आहे. Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल, जो 9 ऑगस्टपर्यंत चालेल. एकूण 5 दिवसांच्या या सेलमध्ये विविध वस्तू, इलेक्ट्रिकल सामान, घरातील गरजेच्या वस्तू, कपडे आदी वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. हा सेल 5 ऑगस्टपासून जरी सुरु होत असला तरी Amazon प्राइम सदस्यांसाठी हा सेल 4 ऑगस्टपासूनच सुरु होणार आहे. म्हणजेच प्राइम सदस्यांना स्टॉक शिल्लक असतानाच खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.
Update ‼ Amazon's Great Freedom Festival dates revised
— Best Deals in INDIA (@BestDealsinIND) August 1, 2023
Amazon: Great Freedom Festival Sale (4th - 8th August)
? 10% Discount with SBI Credit Card
Link: https://t.co/iChMmQZr9Q
✅ Sale Starts 3rd August at 12 Noon - for PRIME Members pic.twitter.com/NQmdUn01sS
काय असेल खास?
या फ्रीडम सेलमध्ये ग्राहकांना बंपर सूट दिली जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवगेळ्या ऑफर्स घेऊन येत असते. सवलतीचा फायदा ग्राहकांना होतच असतो. त्यामुळे ग्राहक देखील वेगवगेळ्या कंपन्यांच्या सेलची घोषणा होण्याची वाट बघत असतात.
Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची तारीख जाहीर झाली असली तरी ऑफर आणि डील्स काय स्टील हे अजूनही स्पष्ट केले गेले नाहीये. मात्र दरवर्षीचा फ्रीडम फेस्टिव्हलचा ट्रेंड बघता ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळू शकते. तसेच क्रेडीट कार्डच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देखील अतिरिक्त सूट दिली जावू शकते. SBI, HDFC सारख्या क्रेडिट कार्ड धारक आणि EMI व्यवहारांवर इंस्टंट 10 टक्के सूट ग्राहकांना मिळू शकते.
नो-कॉस्ट ईएमआय पर्याय
ॲमेझॉन स्पेशल सेलमध्ये स्मार्टफोनची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोनवर दिली जाणारी बंपर सूट. वेगवेगळ्या कंपन्याच्या स्मार्टफोन्सवर 20-40% सवलत दिली जाऊ शकते तसेच त्यावर नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. यासोबतच हेडफोन्स, स्मार्टवॉचसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील बाजारभावापेक्षा कमी दरात ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. स्मार्ट टीव्हीसह इतर उत्पादनांवर 65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल असा अंदाज आहे.
याशिवाय महिला, पुरुष आणि लहान मुलांच्या कपड्यांवर तसेच बेडशीट, पडदे व इतर कपड्यांवर 40-65% सवलत उपलब्ध करून दिली जाऊ शकते.