Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amar Bose : रेडिओ रीपेअरिंग ते आघाडाची साऊंड कंपनी, जाणून घ्या 'BOSE' चा प्रवास

Amar Bose

Image Source : www.india.postsen.com

Bose Corporation brand story : Amar Bose यांना लहानपणी असणारी वस्तू दुरुस्त करण्याची आवड, त्यातून रेडिओ रीपेअरिंग व्यवसाय ते आजची कंपनी हा प्रवास जाणून घेणे इंटरेस्टिंग आहे.

 बोस कॉर्पोरेशनच्या ( Bose Corporation ) स्थापनेला जवळजवळ 6 दशके पूर्ण झाली आहेत. 1964 मध्ये स्थापना झाली. कंपनीचे पहिले प्रोडक्ट 1966 मध्ये लाँच करण्यात आले. मार्केटमध्ये या  प्रॉडक्टचे चांगले स्वागत झाले.  यानंतर जवळपास 2 वर्षानी कंपनीने  1968 मध्ये BOSE 901 नावाची स्पीकर सिस्टीम लाँच केल्यानंतर कंपनीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत गेली. या कंपनीचा आपले स्थान निर्माण करण्याचा आणि सह संस्थापक अमर बोस यांचा प्रवास कसा होता ते जाणून घेणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

लहानपणापासूनच वस्तू दुरुस्त करण्यात होता इंटरेस्ट  

1929 मध्ये अमर बोस (Amar Bose ) यांचा जन्म झाला तेव्हा कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती.  पत्नी आणि मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यासाठीही वडिलांकडे  पैसे नव्हते. ते शेअर बाजारात सक्रिय होते. यात त्यांचे मोठे नुकसान झाले होते. मित्रमंडळीकडून कर्ज घेण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये लहानपणापासून इंटरेस्ट  अमर बोस यांना लहानपणापासूनच इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये  इंटरेस्ट  होता.  या अशा वस्तू  दुरुस्त करायलाही त्यांना मजा वाटत असे.  ते जुन्या वस्तू  विकत घ्यायचे आणि तो दुरुस्त करायचे . बोस यांनी स्वत:च्या  घरामध्येच  रेडिओ दुरुस्तीचे काम देखील सुरू केले होते.  यामुळे लहान वयातच त्यांना स्वत:च्या खर्चासाठी लागणारे पैसे मिळवता यायचे. 

असा झाला  Bose Corporation चा जन्म 

यातून  साऊंड सिस्टीममधला त्यांचा इंटरेस्ट वाढला.  यातून पुढे त्यांनी इंजिनिअरिंगला  प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये त्यांना  एक चांगले प्राध्यापक मिळाले.  व्हाय डब्ल्यू यांनी अमर बोस यांचे गूण ओळखले. त्यांनीच बोस यांना इलेक्ट्रिकल कंपनी सुरू करण्याचा सल्ला दिला होता.  अमर बोस यांनी बाजारात असलेल्या साउंड सिस्टीमचा अभ्यास केला. त्यात त्यांना कमतरता भासली.  यामुले त्यांनी या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.  पुढे एक एक प्रॉडक्ट बाजारात आली तशी कंपनीची लोकप्रियता वाढत गेली.  आज बोस साऊंड सिस्टम जगात आपली एक ओळख निर्माण केली आहे.  

Amar Bose  यांनी प्राध्यापक म्हणूनही केले काम  

अमर बोस यांचे 2013 मध्ये म्हणजेच सुमारे 10 वर्षापूर्वी निधन झाले. त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती काही अब्ज डॉलर्सच्या घरात पोचली आहे. काही सकसेसफूल व्यक्तींमध्ये दान करण्याचा गुणही दिसून येतो. बोस त्यापैकीच एक. त्यांनी आपल्या संपत्तीचा एक मोठा भाग  एमआयटीला दान केला. बोस यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.  जवळजवळ 45 वर्षे त्यांनी हे काम केले आहे.  या काळात त्यांनी विद्यार्थ्याना बहुमोल मार्गदर्शन केले.