Aman Gupta Life: बिझनेसमॅन अमन गुप्ता (Aman Gupta) यांना करियरच्या सुरूवातीला बरेच अपयश मिळाले. त्यांना खूप वेळा रिजेक्शनचादेखील सामना करावा लागला. पण ते थांबले नाही. त्यांनी आपले कष्ट सुरूच ठेवले. त्यांच्या या यशाचे फळ मिळाले ते म्हणजे त्यांनी उभी केलेली बोट (Boat) कंपनी. त्यांच्या या यशाबद्दल जाणून घेऊयात थोडक्यात
नोकरीत सातत्याने अपयश
शार्क टॅंक इंडियाचे जज अमन गुप्ता यांना करियरच्या सुरूवातीला अनेक कंपन्यांनी त्यांचा रिझ्युम नाकारला होता. त्यांना काम मिळविणे मुश्कील झाले होते. सीए पूर्ण झालेल्या अमन गुप्ता यांना कसेबसे काम मिळाले. त्याठिकाणी दोन वर्ष काम केले. पण त्यांचा काहीतरी करण्याचा जज्बा त्यांना शांत बसून देत नव्हता. मग या गोष्टी त्यांनी आपल्या वडिलांसोबत शेयर केल्या. वडिलांना त्यांनी सांगितले, आपण काहीतरी बिझनेस करूयात. अमन गुप्ता म्हणतात की, आमचा कोणताही बिझनेस नव्हता. पण वडिलांजवळ अनुभव होता व माझ्याजवळ पेशन्स. यामुळेच आम्ही बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.
बिझनेसची सुरूवात...
शार्क अमन गुप्ता यांनी फायनली विचार करून बिझनेस सुरू केला. या उद्योजकाला पहिल्या सेल्सवेळी एका कस्टमरवर खूप राग आला होता. कारण तो वेळ देऊन ही भेटत नव्हता. त्यामुळे त्यांची चिडचिड होत होती. मात्र त्यांवेळी त्यांची वडिलांनी त्यांना एक गोष्ट समजून सांगितली की, बिझनेस करताना कधीही अंहकार (ईगो) ठेवू नये. ही एक चांगली शिकवणच मला इथपर्यंत घेऊन आली असल्याचे अमन यांचे म्हणणे आहे.
बोट कंपनीबाबत
देशात बोट कंपनी ही लोकांच्या मनावर राज्य करित आहेत. बाजारपेठेत बोटचे इअरफोन्स, हेडसेट्स, स्मार्ट वॉचेस, एअर पॉड, ब्ल्यूटूथ स्पीकर्स आणि बरेच काही हे प्रॉडक्ट्सला अव्वल स्थान मिळत आहे. बोटचे प्रॉडक्ट्स वापरण्यास लोकांची मोठी पसंती असते. आता बोट हा एक ब्रॅंड बनला आहे. बोट शिवाय लोक इतर गॅझेटस् खूप कमी प्रमाणात खरेदी करतात. सुरूवातीला ही कंपनी उभी करण्यास खूप आव्हाने आली होती. कोणती बॅंक या कंपनीस कर्ज देण्यास तयार नव्हती. आज शार्क टॅंक इंडियाचे जज अमन गुप्ता यांच्या अथांग प्रयत्नामुळे जगाच्या बाजारपेठेत बोट हा एक ब्रॅंड बनला आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            