Solar Energy Fence Subsidy: अनेक कारणांमुळे शेती पिकाचे नुकसान होते. कधी पावसामुळे, एखाद्या रोगामुळे तर कधी प्राण्यांमुळे. तुम्हाला जर प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करायचे असेल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे सरकारची नवीन योजना. वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सौर कुंपण योजना. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे.
शेतीचा विकास आणि वन्य प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी बफर झोनमधील संवेदनशील गावांमध्ये डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविण्यात येत आहे. मागील काही वर्षात बफर झोन गावातील शेतकऱ्यांना प्रयोजक तत्वावर व्यक्तिगत सौरऊर्जा कुंपन देण्यात आले होते. या सौर उर्जा निरीक्षण केले असता सौर ऊर्जा कुंपणाची किंमत ही लोखंडी जाळीच्या कुंपनाच्या तुलनेत कमी आहे. यामुळे वन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्यता खूप कमी असते. हंगाम संपल्यानंतर के कुंपण तुम्ही काढूनही ठेवू शकता.
Table of contents [Show]
सौर उर्जा कुंपण अनुदानाचे स्वरूप
- सौर ऊर्जा कुंपनाचा लाभ संवेदनशील गावांमध्ये वैयक्तिकरित्या देण्यात येतो.
- सौर ऊर्जा कुंपणाच्या किंमतीच्या 75% रक्कम लाभार्थ्याला दिली जाते.
- सौर उर्जा साहित्याच्या किंमतीचा उर्वरित 25% रक्कमेचा वाटा लाभार्थ्याच्या असतो.
कोणाला मिळणार लाभ?
सौर ऊर्जा कुंपण या योजनेचा लाभ बफर झोनमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे वनक्षेत्र लगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या शेतकन्यांच्या शेती पिकांचे होणारे नुकसान या योजने अंतर्गत सौर ऊर्जेचे कुंपण लावल्यामुळे कमी होणार आहे. बफर झोनमधील शेतकऱ्यांकडून वेळोवेळी तार कुंपण किंवा सौर कुंपण करून देण्याची मागणी सरकारकडे केली जात असते.
लाभार्थी निवडीचे निकष काय?
लाभार्थीकडे गावातील शेतीचा 7/12, गाव नमुना 8 अथवा वन हक्क कायदा अंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थी हा शेती असलेल्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. एखाद्या शेतकऱ्याकडे वरती नमूद केल्याप्रमाणे डॉक्युमेंट असल्यास त्यास ही अट लागू राहणार नाही.
ज्या व्यक्तीवर एखादा वन गुन्हा दाखल झाला असेल त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. एखाद्या व्यक्तिस वाटप झालेल्या वन पट्टा या संदर्भात अतिक्रमणाचा गुन्हा नोंदविला गेला असेल त्यालाही लाभ घेता येणार नाही. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपण किंवा सामूहिक चैन लींक फेन्सिंग यापैकी एकाच योजनेचा लाभ मिळू शकतो.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची जबाबदारी
- लाभार्थ्यांनी आपल्या शेतातील सौर उर्जा कुंपणची देखभाल स्वतः करणे आवश्यक असते.
- शेतातील पीक नसताना सौरऊर्जा कुंपण काढून ठेवण्याची जबाबदारीही शेतकऱ्यांची असते.
- सौर उर्जा कुंपण या योजने अंतर्गत मिळालेले कुंपण विकता येत नाही. तसेच त्याचा दुरुपयोगही करता येणार नाही.
- या अटीचे उल्लघन केल्यास लाभार्थ्यास त्यापुढे वन विभागामार्फत देण्यात येण्याच्या कुठल्याही योजनेचे लाभ मिळणार नाही.
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी त्या भागातील जाहिरात प्रसिद्ध केल्या जातात. तेव्हा तुम्ही अर्ज करू शकता.