Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पंजाबमध्ये दारूच्या किमती 35 ते 60 टक्क्यांनी कमी होणार!

पंजाबमध्ये दारूच्या किमती 35 ते 60 टक्क्यांनी कमी होणार!

Punjab Excise Policy 2022-23 : पंजाब सरकारने 2022-23 या वर्षाचे नवीन उत्पादन शुल्क धोरण (Punjab Excise policy) जाहीर केले. या धोरणातील नवीन दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत.

पंजाब सरकारने बुधवारी दि. 8 जून रोजी 2022-23 या वर्षाचे उत्पादन शुल्क धोरण (Punjab Excise policy) प्रसिद्ध केले. यामुळे पंजाबमध्ये दारूच्या किमती 35 ते 60 टक्क्यांनी खाली येणार आहेत. पंजाब सरकारने कोटा खुला केल्यामुळे, भारतीय बनावटीची विदेशी दारू (Indian Made Foreign Liquor - IMFL) आणि बिअरचे दर 1 जुलैपासून कमी होणार आहेत.

हरियाणाच्या तुलनेत हे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी असणार आहेत. हरियाणा आणि चंदीगड या दोन्ही राज्यातून होणारी दारूची तस्करी थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बिअरचे दर चंदीगडमध्ये 120 ते 150 रुपये प्रति बॉटल आहे. ते पंजाबमध्ये आता नवीन दरानुसार 120 ते 130 रुपये प्रति बॉटल असे असतील. पंजाबमध्ये सध्या बिअरचा दर 180 ते 200 रुपये प्रति बॉटल इतका आहे. तसेच भारतीय बनावटीची विदेशी दारूच्या (IMFL) सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या ब्रँडची किंमत चंदीगडमध्ये 510 रुपये आहे; ती आता पंजाबमध्ये 400 रुपये होईल. सध्या पंजाबमध्ये ही बॉटल 700 रुपयांना मिळते.


नवीन धोरणामुळे पंजाबमधील दारूच्या किमती कमी होतील. पण त्याचबरोबर चंदीगड आणि हरियाणामधून होणारी दारूची तस्करी करणे बंद होईल आणि सरकारच्या महसुलात 40 टक्क्यांनी वाढ होईल. या नवीन धोरणामुळे 2021-22 (Punjab Excise Policy 2022-23) या वर्षातील महसूल 6,158 कोटी रुपयांवरून 9,647.85 कोटी रुपये होईल, अशी सरकारला आशा आहे.

पंजाब सरकारच्या लिकर धोरणातील महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • दारू उत्पादक व वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांची साखळी खंडित करण्यात आली. पूर्वी हे सर्व स्टेकहोल्डर स्वत: दारू विक्री करत होते.
  • देशी दारूच्या विक्रीसाठी, प्रत्येक डिस्टिलर (दारू उत्पादक कंपनी) एक वितरक नियुक्त करेल. या वितरकाच्या माध्यमातून किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा होईल.
  • राज्यात नव्याने दारूची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरील बंदी सरकारने उठवली.
  • दारू विक्रीचा परवाना देणाऱ्या युनिटची संख्या मागील वर्षीच्या 750 वरून 177 वर आणली आहे.