Akshay Kelkar: अखेर बिग बॉसच्या मराठी प्रेक्षकांना त्यांचा विजेता मिळाला. गेल्या शंभर दिवसांपासून हा शो सुरू होता. कोण या स्पर्धेची ट्रॉफी आपल्या नावावर करणार याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अखेर या रियालिटी शो चा रिझल्ट लागला. या शो चा विजेता ‘अक्षय केळकर’ (Akshay Kelkar) यांने ट्राफीसह किती रक्कम प्राप्त केली हे थोडक्यात जाणून घेऊयात.
किती जिंकली रक्कम? (How much Won)
अखेर मराठी बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले पार पडला. या स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहिले, ते म्हणजे अक्षय केळकर व अपूर्वा नेमळेकर. विजेता घोषित करण्यासाठी या दोघांचा हात दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांच्या हातात होतात. फायनली महेश यांनी अक्षय केळकर चा हात वर करून मराठी बिग बॉस 4 चा विजेता म्हणून घोषित केले. अक्षयने विजेता म्हणून ट्रॉफीसह 15 लाख 55 हजार इतकी कमाई केली. तसेच पु.ना.गाडगीळ व सन्स यांच्यावतीने 10 लाख रूपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचरदेखील मिळविले.
कोण होते टॉप 5? (Who are the Top 5)
2 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या रियालिटी शो मध्ये 16 सदस्यांचा समावेश होता. हा शो स्वत:ची पर्सेनिलिटी दाखविण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जितके स्वत:ला रियल दाखवाल, तितके तुम्ही प्रेक्षकांचे लाडके बनता, असा हा शो आहे. त्यामुळे पब्लिक वोटिंगवर दर आठवडयाला या खेळातून एक सदस्य शो च्या बाहेर पडतो. या खेळाच्या टॉप 5 मध्ये आपल्या खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे किरण माने (Kiran Mane), राखी सावंत (Rakhi Sawant), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) व अक्षय केळकर यांचा समावेश होता.
अक्षय केळकर विषयी... (About Akshay Kelkar)
अक्षय हा खूप संघर्ष करून पुढे आलेला अभिनेता आहे. त्याचे वडील रिक्षा चालवितात. विशेष म्हणजे बिग बॉसच्या सेटवर त्याने वडिलांच्या रिक्षातूनच एन्ट्री केली होती. या चित्रपटसृष्टीत त्याने 2013 मध्ये पदार्पण केले होते. 'बे दुणे दहा' ही त्याची पहिली मालिका होती. 'कॉलेज कॅफे' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. 'कमला' मालिकेतील त्याने साकारलेली उदय देशपांडेची त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. अवधूत गुप्तेच्या 'कान्हा' या सिनेमात त्याच्या अभिनयाची झलकदेखील दिसली होती.