Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akasa Air : अकासा एअरलाईन देखील करणार विमानांची खरेदी

Akasa Airlines

Image Source : www.businesstoday.in

भारतीय विमान वाहतूक सेवा देणाोऱ्या अकासा एअरने (Akasa Air )आपल्या ताफ्यातील विमानांचा आकडा हा तीन आकडी करण्याचे उदिष्ट् ठेवेल आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकासाने आणखी चार बोईंग 737-8 विमान खरेदीची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरसह अकासाच्या एकूण विमान खरेदीचा आकडा 76 वर पोहोचला आहे.

एअर इंडिया (Air India) आणि इंडिगो (Indigo) कंपन्यांनी नुकताच एअरबसकडे (Airbus) विमान खरेदीचा करार केला आहे. त्यानंतर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात नव्यानेच सुरू झालेल्या अकासा एअरलाईने (Akasa Airline) देखील विमानांची खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. पॅरिस एअर शोमध्ये अकासा एअर लाईनने आणखी चार बोईंग 737-8 विमान खरेदीची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरसह अकासाच्या विमान खरेदीचा आकडा 76 वर पोहोचला आहे. या वर्षाअखेरपर्यंत विमानांची एकूण संख्या तीन आकडी करण्याचे नियोजन अकासा एअरलाइन्सने केले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

विमानांची ऑर्डर 76 वर : Total 76 aircraft

या 4 विमानांच्या ऑर्डसह एकूण अकासा एअरलाईनची विमानांच्या ऑर्डरचा आकडा 76 वर पोहोचला आहे. त्यामध्ये 737-8 विमानांची संख्या 23,आणि 53 उच्च क्षमतेची 737-8-200 विमाने आहेत. यूएस मधील बोईंगकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, बोईंग आणि अकासा एअरने या ऑर्डरच्या एकूण मूल्याचा तपशील दिलेला नाही.

देशांतर्गत विमान सेवा- Domestic Airline Services

अकासा एअरलाईन कंपनीची विमान वाहतूक सेवा 2022 मध्ये ऑगस्टपासून सुरू झाली. बोईंगकडून यापूर्वीच 19 विमाने मिळाली आहेत. पुढील चार वर्षांत उर्वरित 57 विमाने एअरलाईनला मिळण्याची अपेक्षा आहे. अकासा एअर (Akasa Air) सध्या देशांतर्गत  16 स्थळांसाठी हवाई सेवा देते. देशांतर्गत बाजारपेठेतील प्रवासी वाहतुकीचा हिस्सा जवळपास 5 टक्के आहे.

शेअर मार्केटमधील बिग बूल झुनझुनवालांची गुंतवणूक- Big bull Rakesh Jhunjhunwala

अकासा एअरलाईन सुरू करण्यासाठी भारतातील अब्जाधीश दिवंगत व्यापारी राकेश झुनझुनवाला यांची 46% गुंतवणूक केली होती. आदित्य घोष यांच्याकडे 10% भागीदारी आहे. तसेच एअरलाईनचे सीईओ विनय दुबे यांच्याकडे 31% एअरलाइन्सची भागीदारी आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये या कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले होते.