एअरटेल, भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीपैकी एक आहे. आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही कंपनी विविध रिचार्ज योजना ऑफर करते. या योजनांमध्ये अमर्यादित इंटरनेट, हाय-स्पीड 5G डेटा पॅक आणि अगदी मोफत OTT सबस्क्रिप्शनसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल आणि एअरटेलचे सिम सेकंड नंबर म्हणूनही वापरत असाल, तरीसुध्दा एअरटेल एक महिन्याच्या व्हॅलिडीटीसह कमी पैशांचा रिचार्ज असलेला प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि डेटाचाही फायदा मिळत असते. आज तुम्हाला एअरटेलच्या
200 रुपयांपेक्षाही कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन सांगणार आहोत.
155 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलचा 155 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 24 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो. प्लॅमध्ये आमर्यादित कॉलिंग , 300 एसएसएस आणि एकूण 1GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकची देखील सुविधा मिळणार आहे. आधी हा प्लॅन 99 रुपयांचा होता. परंतु अलीकडे Airtel ने हा प्लॅन महाग केला आहे.
179 रुपयांचा प्लॅन
179 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, 300 एसएमएस आणि एकूण 1GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिक देखील अॅक्सेस करु शकता.
199 रुपयांचा प्लॅन
30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह या प्लॅन मध्ये एसटीडी आणि रोमिंग नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळते. यासह एकूण 3GB डेटा ऑफर करते. आणि यात विंक आणि हॅलो ट्यून्सचा लाभ देखील मिळतो.
परंतु जर तुम्हाला एअरटेलची 5G सेवा पाहिजे असेल, तर तुम्हाला 239 रुपये किंवा त्याहून अधिकचा रिचार्ज प्लॅन करावा लागेल. 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचे एअरटेल प्लॅन एअरटेल वेबसाइट आणि एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करु शकता.