Jio & Airtel Plan: भारतातील जिओ व एयरटेल युझर्स धारकांना नवीन वर्षातच मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच तुमच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे. झाले असे की, 2023 च्या सुरूवातीलाच Jio आणि Airtel कंपनी आपल्या प्लान्सच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. या दोन्ही मोठया कंपन्या टॅरिफ प्लान्सच्या किंमतीत अधिक वाढ करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. यामध्ये नक्की किती वाढ होणार आहे हे पाहुयात
किती टक्के वाढणार
Analysts जेफरिजच्या माहितीनुसार, जिओ व एअरटेल युझर्सच्या मोबाईल बिलामध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे या युझर्स धारकांनी आपले मंथली बजेट एक्स्ट्रा काढून ठेवण्याची केली पाहिजे. सांगण्यात येत आहे की, जवळ जवळ या दोन्ही कंपन्या प्लान्सच्या किंमतीत 10 टक्के पर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे . मिळकत व मार्जिनवरून खूप दबाव वाढला असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे समजते.
कधी होणार वाढ
जिओ व एयरटेल या दोन्ही कंपनीने काही महिन्यांपूर्वीच प्लॅनच्या किंमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. आता पुन्हा दुसरा धक्का देण्याच्या तयारीत या मोठया कंपन्या दिसत आहेत. कंपन्यांचा मूळ हेतू उत्पन्नात वाढ करणे हा असल्याने त्यांनी प्लॅनच्या किंमतीत वाढ करविण्याचे ठरविले आहे. आता ही वाढ दोन्ही कंपनीचे आर्थिक वर्ष 2023, 2024 व 2025 च्या चौथ्या तिमाहीत करण्याची शक्यता आहे.
एअरटेलने केली टेस्टिंग
एअरटेलने 2022 च्या सुरुवातीलाच परीक्षण (टेस्टिंग) केले आहे. या कंपनीने काही सर्कलमध्ये 99 रुपयांचे पॅक हटवले होते. टॅरिफ वाढ ही टेल्कोच्या ग्रामीण क्षेत्रात विस्तार करण्याच्या हेतूने करण्यात आली होते. ही टेस्टिंग पाहता, जिओ व एअरटेलने 2.2 मिलियन नवीन यूजर्सला आकर्षित केले असल्याचे सांगण्यात येत आहे.