Airtel Annual Plan: सध्या मोबाईल युजर्सची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. एकाच घरात प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोबाईलचा रिचार्ज करताना युजर्स अगदी योग्य प्लॅनचा विचार करतात. जेणेकरून आपल्या खिशावर जास्त भार पडणार नाही. असाच एक प्लॅन आम्ही सांगणार आहोत, जे तुम्हाला वर्षातून एकदाच रिचार्ज करावा लागेल. हा प्लॅन कोणता आहे, याविषयी अधिक जाणून घेऊयात.
2999 रुपयांचे रिचार्ज
मोबाईल युजर्ससाठी एअरटेल कंपनी हा सर्वात बेस्ट प्लॅन घेऊन आली. जे तुम्ही रिचार्ज फक्त वर्षातून एकदाच करू शकता. एअरटेल युजर्स आपल्या बजेटनुसार, या रिचार्ज प्लॅनची निवड करू शकतात. यामध्ये 2999 रुपयांचा हा प्लॅन आहे. याचा कालावधी 365 दिवसांचा आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत आपल्याला दररोज वापरण्यासाठी 2 जीबी डेटा मिळेल. तुम्हाला जर सातत्याने रिचार्ज करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही हा प्लॅन रिचार्ज करू शकता. जेणेकरून एकदा रिचार्ज केले की, तुम्हाला वर्षभर याकडे पाहण्याची गरज पडणार नाही. एअरटेलच्या या 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक नाही अनेक फायदे होणार आहे. एअरटेलच्या या प्रीपेड प्लनमध्ये दररोज 2 जीबी डेटा देण्यात आला आहे. म्हणजेच युजर्सला एकूण 730 जीबी 4 जी (4G) डेटा मिळतो. या प्लॅननुसार, डेटा संपल्यानंतर त्याची स्पीड कमी होवून 64Kbps होते. हा प्लॅनचा कालावधी एक वर्षाचा आहे. सोबतच अनलिमिटेड कॉल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग फ्री देण्यात आले आहे. तसेच या प्लॅनमध्ये युजर्स दररोज 100 एसएमएसदेखील पाठवू शकतात.
3559 रुपयांचे रिचार्ज
3559 रूपयांचा रिचार्जदेखील तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. एअरटेलच्या या रिचार्जचा कालावधी वर्षभर आहे. या प्लॅनमध्ये 2.5 जीबी डेटा देण्यात आला आहे. 4 जी डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होवून 64Kbps राहते. या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 एसएमएस दररोज मिळेल. या व्यतिरिक्त, वर्षभरासाठी Prime Video Mobile Edition चे सब्सक्रिप्शनदेखील फ्री मिळेल. वर्षभरासाठी Disney+ Hotstar Mobile मेंबरशिप सुद्धा या प्लॅनमध्ये फ्री असते. सोबत Apollo 24|7 Circle, फास्टॅगवर 100 रुपये कॅशबॅक व फ्री हॅलोट्यून्सची सुविधा मिळते. तसेच Wynk Music चे फ्री (Free) सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते.