Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air Vistara Fine: सामाजिक प्रश्नांसाठी तत्पर टाटा कंपनीलाच भरावा लागला दंड, Air Vistara चं काय चुकलं?

Air Vistara Fine

Image Source : www.twitter.com

टाटा कंपनीचा अनेक सामाजिक कामात पुढाकार असतो. मात्रा, टाटा ग्रूपच्या Air Vistara या कंपनीला सामाजिक उपक्रमाचे लक्ष्य पूर्ण न केल्याने 70 लाखांचा दंड भरावा लागला आहे. Directorate General of Civil Aviation (DGCA) या नागरी विमान उड्डाण नियामक संस्थेने हा दंड आकारला.

Air Vistara Fine: टाटा कंपनी ही भारतीय उद्योग विश्वातील एक आघाडीची आणि प्रतिष्ठित कंपनी आहे. समाजाप्रतिचं दायित्व पूर्ण करण्यासाठी कंपनी कायमच आघाडीवर असते. कंपनीचे प्रमुख रतन टाटा हे नाव भारतीयांच्या मनात बसलं आहे. अनेक सामाजिक कामात कंपनीचा पुढाकार असतो. मात्रा, टाटा ग्रुपच्या Air Vistara या कंपनीला सामाजिक उपक्रमाचे लक्ष्य पूर्ण न केल्याने 70 लाखांचा दंड भरावा लागला आहे. Directorate General of Civil Aviation (DGCA) या नागरी विमान उड्डाण नियामक संस्थेने हा दंड आकारला.

एअर विस्ताराला का भरावा लागला दंड (Why Tatat air Vistara paid fine)

केंद्र सरकारने देशातील दुर्गम भागात विमानाचे जाळे पसरवण्यासाठी 'उडाण - उडे देश का आम नागरिक' योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विमान कंपन्यांना दुर्गम भागात फ्लाइट्सचे लक्ष्य घालून दिले आहे. प्रत्येक विमान कंपनीला हे लक्ष्य पूर्ण करावे लागते. मात्र, टाटा कंपनीने हे लक्ष्य पूर्ण केले नाही. ईशान्य भारतात टाटा विस्ताराने कमी फ्लाइट्स चालवल्याने हा दंड आकारण्यात आला. देशभर विमानाचे जाळे उभे करण्यासाठी उडाण योजना महत्त्वाची ठरत आहे.

टाटा विस्ताराचे म्हणणे काय? (Air Vistara On DGCA fine)

डीजीसीएने दंड आकारल्यानंतर टाटा कंपनीने हा दंड तत्काळ भरला आहे. मात्र, निषेध म्हणून हा दंड भरला. ईशान्य भारतात विमानाच्या फेऱ्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था केली होती. मात्र, दार्जिलिंग जवळील बागडोगरा विमानतळ बंद करण्यात आल्याने कंपनीला आपले लक्ष्य पूर्ण करता आले नाही, असे कंपनीने म्हटले आहे. दंडाची रक्कम भरल्याच्या वृत्तास डीजीसीएनेही दुजोरा दिला आहे. DGCA ने घालून दिलेल्या RDG (Route Dispersal Guidelines) नियमावलीचे एअर विस्तारा मागील अनेक वर्षांपासून पालन करत आहे. त्याअंतर्गत विविध उपाययोजना करण्यात आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

उडाण योजना काय आहे (What is Udan scheme)

उडाण योजना केंद्र सरकारने 2016 साली सुरू केली आहे. याअंतर्गत देशभर स्वस्तात विमान प्रवास नागरिकांना करता येतो. तसेच या योजनेंतर्गत नवे विमातळही बांधण्यात येत आहेत. पर्यटन स्थळे आणि देशातील प्रसिद्ध देवस्थान स्थळे या योजनेंतर्गत जोडण्याचे काम करण्यात येत आहे. विमानतळ विकास, धावपट्टी निर्मिती, प्रवासी सुविधा देण्यासाठी निधी खर्च करण्यात येतो.