• 27 Mar, 2023 06:47

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India hiring: एअर इंडियात मेगा भरती! 900 पायलट आणि 4 हजारांपेक्षा जास्त 'केबिन क्रू' ची गरज

Air India hiring

एअर इंडियामध्ये मेगा भरती होणार असून जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. एअर इंडिया तब्बल 4200 केबिन क्रू आणि 900 पायलट्सची भरती करणार आहे. 2023 म्हणजे चालू वर्षातच ही मेगा भरती होणार आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घ्यायला हवा.

Air India hiring: एअर इंडियामध्ये मेगा भरती होणार असून जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. एअर इंडिया तब्बल 4200 केबिन क्रू आणि 900 पायलट्सची भरती करणार आहे. 2023 म्हणजे चालू वर्षातच ही मेगा भरती होणार आहे. नुकतेच एअर इंडियाने बोइंग आणि एअर बस कंपनीकडून 470 विमान खरेदी करण्याचा करार केला. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घ्यायला हवा.

एअर इंडियाला कर्मचाऱ्यांचा तुटवडा (Hirning in Air India)

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्या भविष्यात वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज कंपनीला भासत आहे. सध्या एअर इंडियाच्या ताफ्यात 113 विमाने असून सुमारे सोळाशे पायलट्स आहेत. मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे लांब पल्ल्याच्या फ्लाइट्स रद्द झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

टाटा एअरलाइन्सच्या दोन सहयोगी कंपन्या असून एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडिया या दोन्हींकडे मिळून 850 पायलट आहेत. तर 54 विमाने कार्यरत आहेत. विस्तारासोबत टाटा कंपनीची भागीदारी असून या सेवेसाठी 600 पायलट आहेत. एअर इंडियाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी टाटा कंपनीने आक्रमक धोरण आखले आहे. 

नवीन विमाने ताफ्यात दाखल होणार (New aircrafts In Air India fleet)

या महिन्याच्या सुरुवातीला टाटा कंपनीने एअर बस आणि बोइंग कंपनीकडून 470 नवी विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. यातील काही विमानांना अत्याधुनिक रोल्स रॉयल्स कंपनीने तयार केलेले इंजिन्स बसवण्यात येणार आहे. तर टाटा कंपनीने 36 विमाने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतली आहेत. B 777-200 LR श्रेणीतील ही विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात आली आहेत. 

भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण (High quality training to Crew members)

टाटा कंपनीमध्ये निवड होणाऱ्या केबिन क्रू ला 15 आठवडे सुरक्षा आणि सेवांच्या बाबतीतील कौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. इन-फ्लाइट आणि क्लासरुममध्ये कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात येईल. मागील सहा महिन्यात कंपनीने 1100 कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिली आहे.

विमानतळांवरील विविध सेवांसाठी हजारो प्रत्येक विमान कंपनीचे शेकडो कर्मचारी चोविस तास विविध पाळींमध्ये काम करतात. विमानतळांवरील सेवांसाठी एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड ( AI Airport Services Limited) या कंपनीकडून क्षेत्रनिहाय भरती केली जाते. यात रॅम्प मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ड्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर, कस्टमर केअर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह अशा पदांसाठी भरती होते.