Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India tickets Sale: युरोप ट्रिप करा 40 हजार रुपयांत; एअर इंडियाची ही खास ऑफर चेक करा

Air India

Image Source : travelobiz.com

युरोपातील सुंदर शहरं आणि पर्यटन स्थळं पाहण्याचं स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून असतो. मात्र, ट्रिपचा खर्च जास्त असल्यानं अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, एअर इंडियाच्या ऑफरमुळे तुमचं युरोप फिरण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ते ही अगदी माफक दरात.

Air India tickets Sale: युरोपातील सुंदर शहरं आणि पर्यटन स्थळं फिरण्याचं स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून असतो. मात्र, ट्रिपचा खर्च जास्त असल्यानं अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, एअर इंडियाच्या ऑफरमुळे तुमचं युरोप फिरण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. युरोपातील काही ठराविक शहरांची राउंड ट्रिप फक्त 40 हजारात करता येऊ शकते. एअर इंडियाने ही ऑफर ठराविक कालावधीसाठी आणली आहे.

इंग्लडसह युरोपातील पाच शहरांचा समावेश 

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑफरमध्ये ग्राहकांना युरोपातील 5 शहरांची राऊंड ट्रिप 40 हजार रुपयांत करता येईल. यात इंग्लडचाही समावेश आहे. तर कोपनहेगन (डेनमार्क), लंडन (इंग्लड), मिलान (इटली), पॅरिस(फ्रान्स) आणि व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) या शहरांच्या वन वे फ्लाइटसाठी 25 हजार रुपये तिकिट आहे. ही ऑफर इकॉनॉमी श्रेणीतील तिकिटांवर आहे. 

कधीपासून तिकिट बुक करता येईल?

स्पेशल डिस्काउंटेड तिकिट ग्राहक 14 ऑक्टोबरपासून बुक करू शकतात. 15 डिसेंबरपर्यंतच्या प्रवासाची तिकिटे ऑफरमध्ये बुक करता येतील. त्यामुळे जर तुम्हाला युरोप ट्रिप स्वस्तात करायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. एअर इंडियाचे संकेतस्थळ, अॅप, ट्रॅव्हल एजंटद्वारे तिकिट बुक करता येईल. 

प्रथम बुक करणाऱ्यास प्राधान्य 

ही ऑफर ठराविक कालावधीसाठी असून फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्वावर राबवली जाईल. सध्या दिल्ली आणि मुंबईवरून एअर इंडियाच्या युरोपातील पाच शहरांत 48 नॉन स्टॉप फ्लाइट्स आहेत. डिस्काउंटमध्ये मिळणाऱ्या तिकिटांचे दर शहरानुसार किंचित कमी जास्त होऊ शकतात, असे एअर इंडियाने म्हटले आहे. नियम, अटी आणि इतर माहितीसाठी एअर इंडियाच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता किंवा संकेतस्थळावर ऑफरबद्दल अधिक माहिती मिळेल.