टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने 18 ऑक्टोबरपर्यंत इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. याचे कारण म्हणजे इस्रायल-हमास यांच्यादरम्यान सुरु असलेले युध्द. युध्दभूमीवर विमान प्रवास सेवा न देण्याचा निर्णय एयर इंडियाने घेतला आहे. याआधी 14 ऑक्टोबरपर्यंत विमानसेवा बंद करण्याचे कंपनीने जाहीर केले होते, मात्र आता हा कालावधी 4 दिवसांनी आणखी वाढवला गेला आहे.
युध्द थांबण्याची चिन्हे दिसेना
इस्रायल-हमास यांच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धात आतापर्यत शेकडो नागरिकांचे प्राण गेले आहेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आपल्या मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ सुरु केले आहे.
Operation Ajay साठी एयर इंडियाच्या विमानांचा वापर केला जात आहे. युध्द सुरु झाल्यापासून एयर इंडियाने प्रवासी उड्डाणे बंद केली असली तरी इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी स्पेशल 2 उड्डाणे केली होती. पहिल्या उड्डाणात 212 प्रवासी तर दुसऱ्या फेरीत 235 प्रवाशांना एयर इंडियाने सुखरूप भारतात परत आणले आहे.
18 ऑक्टोबरपर्यंत इस्रायलला जाणारे विमान रद्द केल्याने एकूण 5 विमानाची उड्डाणे होणार नाहीयेत. ज्या नागरिकांनी आधीच तिकीट बुक केले होते, त्यांच्यासाठी एयर इंडियाने काही सूचना जारी केल्या आहेत.
IMPORTANT ANNOUNCEMENT:
— Air India (@airindia) October 10, 2023
Air India is offering a one-time waiver on charges for rescheduling or cancellation of confirmed tickets on flights to and from Tel Aviv. The offer is valid on tickets issued before 9th October for travel until 31st October 2023.
Customer Care Contact…
प्रवाशांना मिळेल सुविधा
एअर इंडियानेभारतातून तेल अवीवला (Tel Aviv) जाणार्या आणि तेथून भारतात येणाऱ्या फ्लाइट्सवरील कन्फर्म तिकीटे पुन्हा शेड्यूल करणे (Rescheduling Israel Flight) किंवा रद्द करणे यासाठीचे शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे.मात्र या सुविधेचा फायदा ग्राहकांना केवळ एकदाच घेता येणार आहे.
तसेच ज्या ग्राहकांनी त्यांची तिकिटे 9 ऑक्टोबरच्या आधी बुक केलेली असतील आणि ज्यांच्या प्रवास तारखा 31 ऑक्टोबरच्या आता असतील अशांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे.
बुकिंग रद्द करण्यास पसंती
इस्रायल-हमास युद्धाने जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे विमान तिकीट पुन्हा शेड्यूल करण्यापेक्षा लोक इस्रायलला जाण्याचे टाळताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर डिसेंबर आणि त्यांनतरचे बुकिंग रद्द करण्यात यावे यासाठी कंपनीला गाहक विनंती करताना दिसत आहेत. मात्र सध्या ऑक्टोबर महिन्यातील तिकिटांवरच ग्राहकांना रिशेड्यूलींग आणि रद्द करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.