E-NAM Agriculture Trade : केंद्र सरकराकडून स्थापन करण्यात आलेल्या ई-नाम या ऑनलाईन पोर्टलवरील कृषी उत्पादन व्यापारामध्ये आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021 ते 2022 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 व्यापारामध्ये तब्बल 32 टक्क्यांची वाढ झाली असून 74 लाख 656 कोटी रूपयाची उलाढाल या संपूर्ण वर्षात झाली आहे. गेल्या सात वर्षानंतर ई-नाम पोर्टलवरील व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावर वृद्धी होताना दिसून येत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 1 ट्रिलियन व्यापार या पोर्टलच्या माध्यमातून होईल असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी बांधला आहे.
यासोबतच अधिकाधिक शेतकरी, व्यापारी व शेतमाल उत्पादन संस्थासुद्धा या पोर्टलवर नावनोंदणी करण्यास पसंती देत आहेत. यामुळे राज्यातंर्गत व आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी संबंधित घटक प्रभावीरित्या या पोर्टलचा वापर करत आहेत.
ई-नाम पोर्टलवरील व्यापार
आर्थिक वर्ष 2023 मध्ये या पोर्टलच्या माध्यमातून 18.6 मिलीयन टन शेतमालाची विक्री मुळे या पोर्टलवरून 74 लाख 656 कोटी रूपयाची उलाढाल झाली. तर आर्थिक वर्ष 2022 या आर्थिक वर्षात 56,497 कोटीची उलाढाल झाली होती. तर 13.2 मिलीयन टन शेतमालाची विक्री या माध्यमातून झाली होती. या पोर्टलच्या माध्यमातून 2023 या वर्षात उत्तरप्रदेश, काश्मिर, राजस्थान व महाराष्ट्र या आंतरराज्यमध्ये बटाटा, अॅपल, राई, रागी, रेशीम, सोयाबीन, चना आणि जीरा या मालांची चांगली खरेदी-विक्री झाली आहे.
ई-नाम पोर्टल म्हणजे काय
ई-नाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (Electronic National Agriculture Market). 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजाराचा शुभारंभ केला गेला. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यांतर्गत व आंतरराज्य शेतकरी आपल्या शेतमालाची थेट विक्री करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना, खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना व कृषी उत्पादन संस्थांना पोर्टलवर नावनोंदणी करावी लागते. आजघडीला 27 राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील 1 हजार 361 कृषी मंडी, 17.5 कोटी शेतकरी, लाखो व्यापारी व कमिशन एजंट या पोर्टलशी सलग्न आहेत.
शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल योग्य पद्धतीने आणि सुस्थितीत विकता यावा यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी 60 खासगी संस्थांची करार केला आहे. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यापार, लॉजिस्टीक, वाहतुक, पॅकेजिंग, पिकांच्या लागवडीवेळी उपयुक्त हवामान अंदाज, फिनटेक सेवा अशा विविध सुविधा उपल्बध करून दिल्या आहेत. या विविध संस्थांच्या सोई-सुविधांच्या मार्फत शेतकरी उत्तम पद्धतीने आपल्या शेतमालाचे उत्पादन करून सोप्या पद्धतीने योग्य त्या भावात थेट विक्री करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात सुद्धा वाढ होत आहे.
ई-नाम पोर्टलवर नोंदणी कशी करायची
केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची रास्त दरात थेट विक्री करता यावी यासाठी या पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलवर कोणताही शेतकरी आपली नोंदणी करून व्यापार करू शकतो. ई-नाम पोर्टलच्या या https://www.enam.gov.in/web/ लिंकववर जाऊन त्याठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसतो. त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या फॉर्मनुसार आपण आपली आवश्यक ती माहिती भरून आपली नावनोंदणी करु शकतो.
या संकेतस्थळावर आपल्याला या ऑनलाईन पोर्टलशी जोडल्या गेलेल्या व्यापार घटकाबद्दल, दररोजच्या भाजीपाला व इतर धान्यांच्या दरांची रियल टाइम दर अन्य सुविधा, व्यापारासाठी राज्यानुसार दिलेल्या सुविधा अशी सर्व माहिती सविस्तर स्वरूपात मिळते. महत्त्वाचं म्हणजे या संकेतस्थळावर सर्व भाषा समाविष्ट केल्याने आपण मराठी भाषेत ही या पोर्टलचा वापर करू शकतो. त्यामुळए भाषेचा अडसर येत नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पोर्टलप्रमाणे शेतकऱ्यांना मोबाईलवरून हा व्यापार हाताळता यावा यासाठी अॅपची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. हे अॅप गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.