SIP Vs Home Loan: नोकरी बदलल्यावर किंवा चांगली पगारवाढ मिळाली तर जास्त मिळालेल्या पैशांचे काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. होम लोन फेडण्यास प्राधान्य द्यावे की SIP मधील गुंतवणूक वाढवावी. दीर्घकाळात काय फायद्याचे ठरेल हे समजत नाही. या लेखात पाहूया कोणत्या पर्याय योग्य ठरू शकतो.
एका उदाहरण पाहूया, राहुल 33 वर्षांचा असून कॉर्पोरेट कंपनीत मागील 5 वर्षांपासून काम करत आहे. नोकरी स्वीच केल्यावर राहुलला 40% पगारवाढ मिळाली. त्यामुळे अचानक त्याच्या हातात येणार पगार वाढला. राहुलने आधीच 28 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. तसेच दरमहा 10 हजार रुपये तो एसआयपी योजनांमध्ये गुंतवत होता.
त्याचा गृहकर्जाचा मासिक हप्ता 45 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत त्याने पगारवाढीतून मिळालेले पैसे गृहकर्ज लवकर फेडण्यासाठी वापरावे की एसआयपीमध्ये हे पैसे गुंतवावे? यात त्याा गोंधळ उडत आहे.
कोणता पर्याय योग्य राहील?
अशा परिस्थितीत राहुलने इक्विटीसंबंधीत SIP मधील गुंतवणूक वाढवणे योग्य राहील. कारण इक्विटीमधील गुंतवणुकीतून दीर्घकाळात मिळणार फायदा जास्त राहू शकतो. गृहकर्जावर जेवढे व्याज भरावे लागेल त्याच्या कितीतरी पट अधिक परतावा SIP मधून मिळेल.
जर त्याने गृहकर्जाचा हप्ता वाढवण्याचा किंवा लोन प्रिपेमेंट करण्याचा निर्णय घेतला तर तोटा होऊ शकतो. कर्ज आधी फेडण्याचा निर्णय घेतला तर पुढील 10 वर्षात राहुलची एकूण संपत्ती कमी होईल. याउलट एसआयपीमधील गुंतवणुकीतून संपत्ती वाढेल, असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात.
राहुलला गृहकर्जावर 9% व्याजदर आहे असे गृहीत धरू. मात्र, म्युच्युअल फंडच्या रेग्युलर SIP योजनेत गुंतवणूक केली तर कमीत कमी 12% आणि डायरेक्ट योजनेत गुंतवणूक केली तर 13.5% पर्यंत परतावा मिळू शकतो. गृहकर्ज फेडण्यापेक्षा एसआयपीतून मिळणारा परतावा अधिक असल्याने दीर्घकाळात संपत्ती वाढण्यास मदत होईल.
SIP तील गुंतवणुकीतून तरलता(लिक्विडिटी) वाढेल?
जर राहुलने एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर गृहकर्जाचे प्रिपेमेंट करण्यासाठी त्याच्याकडे कायमच SIP मधील फंड असेल. तो भविष्यात कधीही या पैशांद्वारे कर्ज फेडू शकतो.
विचारपूर्वक त्याने डायरेक्ट SIP योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. रेग्युलर योजनेपेक्षा दीड ते दोन टक्क्यांनी जास्त परतावा मिळू शकतो. ब्रोकर्स किंवा एजंटद्वारे एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा थेट डायरेक्ट योजनेत गुंतवणूक केली तर परतावा वाढेल, असा सल्ला जाणकार देतात.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)