Naira Energy Price : गेल्या अनेक वर्षांपासून एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती, सातत्याने वाढत असतांना काही कंपन्या ग्राहकांना दिलासा देतांना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने ग्राहकांना सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या दरांपेक्षा 1 रुपयाने स्वस्त देण्याची घोषणा केली होती. तर आता खासगी क्षेत्रातील किरकोळ कंपनी नायरा एनर्जीने सरकारी तेल विपणन कंपन्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेल 1 रुपये कमी दराने विकण्यास सुरुवात केली आहे.
Table of contents [Show]
नायरा देणार स्वस्त पेट्रोल आणि डिझेल
मे 2022 मध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर पेट्रोल 8 रुपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झाले होते. यानंतर विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर,खाजगी कंपन्यांमधून रिलायन्स कंपनीने, रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल इतर कंपन्यांच्या दरापेक्षा 1 रुपये कमी दराने विकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता परत, खासगी क्षेत्रातील किरकोळ कंपनी नायरा एनर्जीने सरकारी तेल विपणन कंपन्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेल 1 रुपये कमी दराने विकण्यास सुरुवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात घसरण
नायराच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल किंवा डिझेल खरेदी केल्यास इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपापेक्षा एक रुपया कमी द्यावा लागेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि त्यांचे UK भागीदार BP PLC आधीच PSU कंपन्यांपेक्षा आधीच कमी दराने पेट्रोल-डील विकत आहेत. सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यानंतरही देशांतर्गत बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी केल्या नाहीत.
तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलची विक्री करणाऱ्या खासगी कंपन्या, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानंतर या घसरणीचा फायदा ग्राहकांना देत आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर 7 रुपयांनी घसरला आहे.
इतर शहरातही स्वस्त सेवा
"देशांतर्गत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी, आम्ही जून 2023 च्या शेवटपर्यंत आमच्या रिटेल आउटलेटवर 1 रुपयांची सूट देत आहोत. आम्ही भारतातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक मजबूत भागीदार असण्यावर विश्वास ठेवतो आणि देशाची मागणी पूर्ण करत राहू, अशी माहिती नायरा एनर्जीच्या प्रवक्त्याने दिली." नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि जयपूरमध्येही सोमवारी पेट्रोलमध्ये किंचित घट दिसून आली.
वेगवेगळ्या शहरातील दर
नायरा एनर्जीची देशातील 86,925 पेट्रोल पंपांमध्ये 7 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. कंपनी महाराष्ट्र आणि राजस्थान सारख्या 10 राज्यांमध्ये IOC, BPCL आणि HPCL पेक्षा 1 रुपये प्रति लिटर कमी दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री करत आहे. दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.