• 08 Jun, 2023 01:23

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ganpati Ticket Booking 2023: चाकरमान्यांनो, 13 सप्टेंबरच्या रेल्वे तिकीट फुल्ल! पुढच्या तिकिटांचे बुकिंग लगेच करून घ्या!

advance railway reservation for ganesh festival

Konkan Railway Ganpati Booking 2023: यावर्षी गणपती बाप्पा 19 सप्टेंबरला येणार असून, गौरी-गणपतींचे विसर्जन 23 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी आणि गावावरून मुंबईत रिटर्न येण्यासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्याचा फॉर्म्युला जाणून घ्या.

Railway Ticket Reservation Plan Open: चाकरमान्यानो, गणपतीला अजून 4 महिने बाकी आहेत. पण कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या तिकीट आजपासून खुल्या झाल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी 13 सप्टेंबरच्या कोकणकन्या एक्सप्रेसच्या सर्व क्लासच्या तिकिट फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे वेळ दवडू नका. गणपतीसाठी गावी जायला 14 सप्टेंबरचे रेल्वेचे कन्फर्म तिकिट हवे असेल तर, उद्या लगेच बुकिंग करून घ्या आणि कन्फर्म तिकिट (Advance Booking for Ganesh Festival Train) मिळवा.

यावर्षी गणपती बाप्पा 19 सप्टेंबरला येणार असून, गौरी-गणपतींचे विसर्जन 23 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे दरवर्षीसारखे यावर्षीही ऐनवेळी तिकिटे मिळाली नाही तर 10 गाड्या बदलून पैसे खर्च करून जीवाचे हाल करून गावाला जाण्याऐवजी, लगेच तिकिट बुक करा आणि कन्फर्म तिकिट मिळवून आरामात गावाला जा.

गणपतीच्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग ओपन

Konkan Railway Ganpati Booking DATE CHART

रेल्वे बोर्डाने गणपतीला कोकणात जाणाऱ्या रेल्वे तिकिटांचे अगाऊ बुकिंग ओपन (Ticket Booking for Konkan Train) केले आहे. आयआरसीटीसीच्या नियमानुसार, मेल एक्सप्रेस गाड्यांचे तिकिट 120 दिवस आधी ओपन होते. तर आपल्या कोकणात जाणाऱ्या मुंबई सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस (12051), दिवा-सावंतवाडी सिंधुदूर्ग एक्सप्रेस (10105), मुंबई सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस (10103), नेत्रावती एक्सप्रेस (16345), एलटीटी-मॅंगलोर मत्सगंधा एक्सप्रेस (12619), मुंबई सीएसएमटी मॅंगलोर एक्सप्रेस (12133), कोकणकन्या एक्सप्रेस (10111) आणि दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (11003) या गाड्यांच्या तिकिटांच्या रिझर्व्हेशनचे बुकिंग ओपन झाले आहे. 13 सप्टेंबरच्या गाडीचे बुकिंग आज (दि. 16 मे) ओपन झाले असून, कोकणकन्या एक्सप्रेसच्या सर्व क्लासचे बुकिंग फुल्ल देखील झाले आहे. त्यामुळे सुखात आणि आरामात बाप्पाला आणायला जायचे असेल. आजच रेल्वेच्या कन्फर्म तिकिटांसाठी बुकिंग करून घ्या.

मुंबईला रिटर्न येणाऱ्या गाड्यांच्या बुकिंगवरही लक्ष ठेवा!

23 सप्टेंबरला गौरी गणपतीचे विसर्जन असून त्याचे बुकिंगही तुम्हाला आताच करावे लागणार आहे. कारण ऐनवेळेला मुंबईला येणाऱ्या गाड्या फुल्ल होतात आणि त्यामुळे सगळ्या कुटुंबाचे हाल होतात. ते होऊ नये म्हणून त्याचे बुकिंगही तुम्हाला 26 मे पासून करता येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही अनंत चतुर्दशीनंतर गावावरून निघणार असाल तर तुम्हाला 28 सप्टेंबरच्या रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी त्याचे बुकिंग 31 मे रोजी करावे लागणार आहे.

Ticket Rates of Daily Mail Express from Mumbai to Konkan

तिकिट बुकिंगसाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

  • कोकणात दररोज मुंबईतून 7 ते 8 आठ एक्सप्रेस ट्रेन सुटतात. 
  • यातील तुमच्या सोयीची आणि तुमच्या वेळेनुसार एक्सप्रेसची निवड करा.
  • वर दिलेला चार्ट तिकिट बुक करताना समोर ठेवा म्हणजे तारीख निवडताना चूक होणार नाही.
  • आता IRCTCच्या साईटवर किंवा अधिकृत मोबाईल अ‍ॅपवरून तिकिट बुक करा.
  • IRCTC वरून तिकिटे बुक करताना शक्यतो हायस्पीड इंटरनेट वापर करा.
  • तिकिट बुक करण्यापूर्वी त्याचे पेमेंट कोणत्या मोडमधून करणार आहात, तेही अगोदर ठरवून घ्या.