Mercedes GLE 43 Safety: ऋषभ पंत सोबतच्या या घटनेने प्रसिद्ध उद्योगपती ‘सायरस मिस्त्री’ यांच्यासोबत झालेल्या भीषण अपघाताची आठवण करून दिली. सायरस मिस्त्री यांना सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अपघातात आपला जीव गमवावा लागला होता, त्यामुळे महागड्या वाहनांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता ऋषभ पंतचा हा अपघात झाला असून, तो महागड्या कारमध्ये नसता, तर त्याचा जीव वाचला असता का? असे प्रश्न समोर येत आहे. असो.. पण गाडी चालविताना सुरक्षिततेसाठी, आम्ही तुम्हाला मर्सिडीज GLE 43 च्या फीचर्ससोबत कारमध्ये प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगणार आहोत.
मर्सिडीज बेंज जीएलई कूप 43 फीचर्स (Mercedes GLE 43)
2019 मध्ये लाँच केलेल्या, मर्सिडीज-बेंझ GLE 43 ला Euro NCAP कडून सर्वोच्च 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. सुरक्षिततेसाठी, या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, सीट बेल्ट वॉर्निंग, ऑटोमेटिक इमरजेंसी ब्रैकिंग, अडैप्टिव ब्रेक लाइट्स, टायर-प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम और मर्सिडीज का प्री-सेफ ऑक्यूपेंट प्रोटेक्शन सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय ओव्हर स्पीड वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, इमर्जन्सी ब्रेक लाईट फ्लॅशिंग, हाय बीम असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन डिपार्चर प्रिव्हेंशन, रिअर क्रॉस ट्रॅफिक असिस्ट, मिडल रीअर थ्री-पॉइंट सीटबेल्ट, मिडल रिअर हेड रेस्ट, चाइल्ड सीट अँकर. पॉइंट, इंजिन इमोबिलायझर, क्रॅश सेन्सर, ईबीडी, हिल डिसेंट कंट्रोल, 360 व्ह्यू कॅमेरा यांसारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.
या टिप्स पाळा, अपघात टाळा
दूरच्या प्रवासाला निघाला असेल, तर दर 60-90 मिनिटांनी ब्रेक घेणे आवश्यक आहे. ब्रेकशिवाय मेंदू जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. कॅफिनयुक्त पेये तुम्हाला ताबडतोब जागे करतील, परंतु काही काळानंतर त्याचा प्रभाव कमी होईल. म्हणून हे टाळण्यासाठी, कार पार्क करा आणि थोडी डुलकी घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कंटाळवाण्या रस्त्यावर आहात, तर विश्रांती घ्या, फेरफटका मारा, तुमच्या मोबाईलवर सोशल मीडियावर अपडेट रहा किंवा एखादा गेम खेळा.
कार खरेदी करताना हे सेफ्टी फीचर्स पाहा
कार खरेदी करताना, सेफ्टी रेटिंग तपासून पहा. सोबतच इतर सेफ्टी फीचर्सवरदेखील लक्ष द्या. जसे की, यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन, रियर कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटो डोअर लॉक/अनलॉक, व्हेरिएबल लॉक/अनलॉक, डेटाइम रनिंग लाइट्स, रिअर डीफॉगर आणि वायपर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, डे/नाईट मिरर ही सेफ्टी फीचर्स पहा.