अदानी समुहामध्ये भारतीय बँकांसह अनेक परदेशी संस्था आणि बँकांनीही गुंतवणूक केली आहे. मात्र, अदानी समुहातील कथित गैरव्यवहाराबाबत हिंडेनबर्ग या गुंतवणूक सल्लागार संस्थेने अहवाल सादर केल्यानंतर कंपनीच्या बाजार मुल्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ज्या संस्था आणि बँकांनी अदानी ग्रूप कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडियाने (LIC Investment in Adani) अदानी समूहामध्ये गुंतवणूक केली आहे. दरम्यान LIC ने त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
अदानी समूहात गुंतवणूक करताना नियमांचे पालन -(Rules and Regulation followed while investing in Adani Group)
अदानी समूहामध्ये गुंतवणूक करताना LIC ने सर्व नियमांचे पालन केले होते, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटले. गुंतवणूक करताना एलआयसीने विमा कायदा 1938 आणि IRDAI Investment Regulations, 2016 चे पालन केले असल्याचे सरकारला सांगितल्याचे ते म्हणाले. अदानी समूहामध्ये सरकारी संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीवरुन लोकसभेमध्ये विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, ही सर्व गुंतवणूक नियमांना धरून असल्याचे सरकारचे सरकारने म्हटले आहे.
LIC मध्ये अदानी समूहाची गुंतवणूक किती? (How much LIC invested in Adani Group)
LIC ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेली रक्कम आजच्या बाजारमूल्याप्रमाणे 36 हजार 474.78 कोटी इतकी आहे. एकूण 0.975 टक्के म्हणजे 1 टक्क्यापेक्षाही कमी गुंतवणूक LIC ने अदानी समुहामध्ये केली आहे. सर्व विमा कंपन्यांना गुंतवणूकीविषयी लागू असणाऱ्या IRDAI नियमांचे पालन करून ही गुंतवणूक केली असल्याचे LIC ने स्पष्ट केले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यापासून कमालीची घसरण पहायला मिळत आहे.
या घसरणीनंतर गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अदानी समूहाचे शेअर्स गडगडल्यामुळे ज्या गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान झाले त्यात सरकारी कंपनी एलआयसीचा देखील समावेश आहे. पहिल्या दोन दिवसात एलआयसीला तब्बल 16 हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यामुळे प्रत्यक्ष अदानींच्या कंपन्यांमध्ये नाही तरी LIC मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.