अदानी ग्रुपनं (Adani group) व्हिसासोबत को-ब्रँड क्रेडिट कार्ड (Credit card) करार केला आहे. जगातली कार्ड पेमेंटमधली सर्वात मोठी कंपनी असलेल्या व्हिसासोबत अदानी ग्रुपनं करार केला आहे. व्हिसा ही अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोस्थित कंपनी आहे. यासंदर्भात व्हिसाचे सीईओ रायन मॅकइनर्नी (Ryan McInerney) यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. अडाणी ग्रुपसोबतच्या भागीदारीमुळे व्हिसाला अडाणी ग्रुपच्या विमानतळे तसंच ऑनलाइन सर्व्हिसेसच्या माध्यमातून 40 कोटी यूझर्सपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
क्रेडिट कार्डचा वापर कुठे जास्त?
रायन मॅकइनर्नी यांनी पुढे सांगितलं, की ब्रीज एव्हिएशन ग्रुप तसंच एलिजिएंट ट्रॅव्हल यांच्यासोबतही करार करण्यात आला आहे. व्हिसाला या क्षेत्रात अधिक फायदा होईल असं वाटत आहे. कारण मागच्या तिमाहीत ट्रॅव्हल आणि रेस्टॉरंट याठिकाणी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यामुळे आगामी काळात हा अधिक फायद्याचा सौदा ठरणार आहे, अशी व्हिसाला आशा आहे.
ट्रॅव्हल बुकिंग क्षेत्रात अडाणींचा रस
ट्रॅव्हल बुकिंगच्या उद्योगात अडाणी ग्रुप सध्या अधिक रस दाखवत आहे. अडाणी ग्रुपची फ्लॅगशीप कंपनी अडाणी एंटरप्रायझेसचं यूनिट अडाणी डिजीटल लॅब्सनं ट्रेनमनला विकत घेण्यासाठी त्याची मुख्य कंपनी स्टार्क एंटरप्रायझेससोबत शेअर खरेदी करार केला. या माध्यमातून ट्रेनमन या कंपनीचं अदानी डिजीटल 100 टक्के अधिग्रहण करू शकणार आहे. अदानी ग्रुपनं याआधी जानेवारीत क्लिअरट्रिपसोबतही करार केला होता. या करारामुळे दोन्ही कंपन्यांना फायदा होणार आहे. अदानी वन या कंपनीच्या माध्यमातून यूझर्स फ्लाइट बुकिंग, पार्किंग, कॅब यासह विविध सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
काय आहे ट्रेनमॅन?
स्टार्क एंटरप्रायझेसतर्फे चालवलं जाणारं एक आयआरसीटीसी (IRCTC) तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. ट्रेन तिकिटांशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी होत असतात. म्हणजेच यावरून तुम्ही तिकीट बुक करू शकता. यासोबत पीएनआर क्रमांक स्टेटस, कोच स्टेटस, ट्रेन रनिंग स्टेटस, सीट्सची उपलब्धता अशा सर्वप्रकारची माहिती यामाध्यमातून मिळवता येते.