Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अदानी समुहाची सिमेंट क्षेत्रात उडी, या कंपन्या खरेदी करणार

अदानी समुहाची सिमेंट क्षेत्रात उडी, या कंपन्या खरेदी करणार

गौतम अदानी होलसिम ग्रुपकडून अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड (Amuja Cements and ACC Cement) कंपन्या खरेदी करण्याचा विचार करत असून, त्यांनी सिमेंट व्यवसायात शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

भारतातील अंबुजा आणि एसीसी सिमेंटची (Amuja Cements and ACC Cement)  मूळ कंपनी होलसिम लिमिटेड (Holcim Limited) या कंपनीने सिमेंट व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या कंपन्या अदानी समूह (Adani Group) विकत घेणार असल्याची चर्चा आहे. ब्लूमबर्ग या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समुहाची अंबुजा आणि एसीसी सिमेंटची मूळ कंपनी होलसिम लिमिटेड कंपनी विकत घेण्याबाबतची बोलणी सुरू आहेत. ही बोलणी योग्यरीत्या पार पडल्यास लवकरच या कंपन्यांमध्ये करार होऊ शकतो.

होलसिमवर कर्जाचा भार

होलसिम कंपनी कर्जाचा भार कमी करण्यासाठी आणि आपल्या व्यवसायात विविधता आणण्यासाठी आपल्या नॉन कोअर संपत्तीची विक्री करत आहे. कंपनीने सप्टेंर महिन्यात ब्राझिलमधील कंपनीची विक्री केली होती. तसेच कंपनी झिम्बॉम्बेमधील व्यवसायाची विक्री करणार असल्याचे वृत्त आहे. होलसिम कंपनी स्वत:च्या ताब्यात असलेला 63.1 टक्के हिस्सा विकणार आहे.

होलसिम खरेदीच्या शर्यतीत जेएसडब्ल्यू (JSW)? 

अदानी समूहाव्यतिरिक्त, जेएसडब्ल्यू (JSW) देखील होलसिम कंपनी खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. पण यात अदानी समूह आघाडीवर असल्याचीच चर्चा अधिक आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

होलसिमची भारतातील व्यावसायिक कारकीर्द

होलसिम समुहाच्या कंपन्या गेल्या 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहेत. या कंपनीचे भारतात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम हे तीन मोठे ब्रँड आहेत. यापैकी अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या कंपन्या शेअर बाजारात लिस्टिंगवर आहेत. अंबुजा सिमेंटमध्ये होलसिमची 63.1 टक्के भागीदारी आहे. तर एसीसी लिमिटेडमध्ये अंबुजा सिमेंटचा 50.05 टक्के हिस्सा आहे आणि होलसिमचा एसीसीमध्ये थेट 4.48 टक्के हिस्सा आहे.