• 05 Feb, 2023 13:52

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group: कर्जाबाबत अदानी समूहाला चिंता नाही, बिझनेस आणखी विस्तारणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे संकेत

adani group

Adani Group: भारतात अदानी ग्रुप मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अदानी ग्रुप आणि रिलायन्स यांच्यात विविध क्षेत्रात निकोपाची स्पर्धा होताना दिसत आहे.अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आणखी विस्ताराचे संकेत दिले आहेत.

वेगाने विस्तारणाऱ्या अदानी समूहावरील कर्जाच्या बोजाबाबत ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठं विधान केले आहे. कर्जाबाबत कोणतीही चिंता नाही, असे अदानी ग्रुपचे मुख्य वित्तीय अधिकारी जगशिंदर सिंग  यांनी स्पष्ट केले आहे. अदानी समूह यापुढे कंपन्यांचे विकेंद्रीकरण करुन विस्तारवादी भूमिका घेईल, असे सिंग यांनी म्हटले आहे.

येत्या 2028 पर्यंत अदानी समूह आणखी नव्या व्यवसायामध्ये प्रवेश करणार आहे.  त्याशिवाय मेटल, डेटा सेंटर, एअरपोर्ट आणि मालवाहतूक या व्यवसायांना विभक्त करुन नव्या कंपन्यांच्या माध्यमातून विस्तार केला जाणार आहे. येत्या 2025-2028 या वर्षांपर्यंत या कंपन्यांची किमान गुंतवणूक प्रोफाईल तयार केली जाणार आहे. या कंपन्यांचा जेव्हा व्यवसाय विभक्त केला जाईल तेव्हा तेथे एक अनुभवी व्यवस्थापन काम करत असेल, असे सिंग यांनी म्हटले आहे.

विमानतळांवरील सेवांबाबतच्या व्यवसायावर अदानी समूहाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतात एअरपोर्ट हॅंडलिंग सर्व्हिसेसमधील सर्वात मोठी कंपनी बनवण्याचे उद्दिष्ट अदानी ग्रुपने ठेवले आहे, असे सिंग यांनी सांगितले. याशिवाय कोळसा, ऊर्जा, विद्युत पारेषण आणि हरित ऊर्जा या व्यवसायात देखील अदानी समूह विस्तार करणार असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

अदानी ग्रुपमधील अदानी एंटरप्राईसेस ही कंपनी फॉलोऑन ऑफरमधून 2.5 बिलियन डॉलर उभारणार आहे. अदानी एंटरप्राईसेस या शेअरमध्ये वर्ष 2022 मध्ये 130% वाढ झाली आहे.