Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Karaikal Port: अदानी समुहाने खरेदी केले 1,485 करोड रुपयांत दक्षिणेतील कराईकल बंदर

Karaikal Port

देशातील एक महत्वाचा उद्योगसमूह म्हणून अदानी उद्योगसमूह ओळखला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक पडझड झाल्यानंतर अदानी उद्योगसमूह पुन्हा एकदा उभारी घेताना दिसतो आहे. पुडुचेरी (Pondicherry) येथील मोक्याचे कराईकल बंदर (Karaikal Port) अदानी उद्योगसमुहाने (Adani Group) विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Karaikal Port Acquired by Ambani Group: अदानी समूहाने दक्षिण भारतातील महत्वाचे समजले जाणारे कराईकल बंदर स्वतःच्या नावावर केले आहे. रीतसर कायदेशीर खरेदी करून आता हे बंदर अदानी समूहाच्या मालकीचे झाले आहे. अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या व्यवहाराला राष्ट्रीय कायदा न्यायाधिकरण (NCLT) ची कायदेशीर मंजुरी देखील मिळाली आहे. कराईकल पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

अनेक दृष्टीने महत्वाचे बंदर

कराईकल पोर्ट हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे बंदर ओळखले जाते. बंगालच्या उपसागरातून होणारी सागरी वाहतूक आता अदानी उद्योगसमूहाला नियंत्रित करता येणार आहे. आखाती आणि युरोपियन देशांमधून भारतात मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात या बंदरातून होत असते. हिंडेनबर्ग रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर अदानी उद्योगसमूहाची आर्थिक पडझड सुरू झाली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी थेट 33 व्या नंबरवर पोहोचले होते. गेल्या 2 आठवड्यापासून पुन्हा अदानी उद्योगसमूहाची घसरलेली गाडी रुळावर यायला सुरुवात झाली आहे.  काराईकल बंदर खरेदी करून सर्वकाही सुरळीत सुरू आहे असे संकेतच अदानी समूहाने दिले आहेत असे म्हणावे लागेल.

काराईकल बंदर हे एक वैशिष्ट्यपूर्ण खोल पाण्याचे बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदरात पाच फंक्शनल बर्थ, तीन रेल्वे साइडिंग, 600 हेक्टर जमीन असून 21.5 दशलक्ष मेट्रिक टन माल वाहतूक करण्याची क्षमता आहे.

अदानी पोर्टचे निवेदन

अदानी पोर्टने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराईकल बंदराच्या अधिग्रहणासाठी 1,485 कोटी रुपयांचा करार झाला आहे. निवेदनानुसार, बंदर तामिळनाडूच्या कंटेनर आधारित औद्योगिक केंद्र आणि आगामी 9 MMTPA CPCL रिफायनरी जवळ आहे. देशभरात अदानी समूहाची आता 14 बंदरे असून, देशातील सर्वात मोठी खाजगी लॉजिस्टिक कंपनी आहे.