Adani Green Energy Company Shares Rise : अदाणींच्या ग्रीन एनर्जी कंपनीचा तिमाही निकाल अदाणी समूहाला प्रचंड नफा मिळवून देणारा ठरला आहे. अदाणींच्या ग्रीन एनर्जी कंपनीने मार्च महिन्याच्या तिमाहीत चारपट नफा कमावला आहे. यामध्ये कंपनीला 507 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. अदाणी ग्रीन एनर्जीने कंपनीचे एमडी आणि सीईओ विनीत एस. जैन यांच्याकडे कंपनीचे एमडी पद सोपविले आहे. विनीत जैन ११ मे २०२३ पासून आपल्या पदावर रुजू होणार आहे.
Table of contents [Show]
दुप्पट नफा
31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 121 कोटी रुपये होता. तर वर्ष 2021 च्या मार्चच्या तिमाहीत हा नफा 1,587 कोटी रुपये होता. ज्यामध्ये वाढ होऊन 2,988 कोटी रुपये झाला आहे, म्हणजे जवळजवळ दुप्पट झालेला आहे.
महसूलात वाढ
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीचा नफा 489 कोटी रुपये होता. तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये तो 973 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न एक वर्षापूर्वी असलेल्या 5,548 कोटी रुपयांवरुन 8,633 कोटी रुपये झाले आहे.
पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प
आर्थिक वर्ष 2023 मध्ये ग्रीन एनर्जी कंपनीची ऊर्जा विक्री 58 टक्क्यांनी वाढलेली आहे. ग्रीन एनर्जी कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,676 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता वाढविली आहे. यामध्ये राजस्थानमधील 2,140 मेगावॅट सौर-पवन संकरीत प्रकल्प, मध्य प्रदेशातील 325 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प, आणि राजस्थानमधील 212 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे. अदाणी ग्रीनने 2023 मध्ये SECI (Solar Energy Corporation of India Limited) बरोबर 450 मेगावॅटचे पवन प्रकल्प आणि 650 मेगावॅटच्या सौर प्रकल्पासाठी PPA (Power Purchase Agreement) वर स्वाक्षरी केली.
शेअर बाजारात तेजी
अदाणींच्या ग्रीन एनर्जी कंपनीला मार्च तिमाहीत चारपट नफा झाल्यानंतर शुक्रवारी अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये 3.67 टक्क्यांनी वाढ दिसून आली. तर आजच्या व्यवहारात 951 रुपयांच्या मागील बंद किमतीवरून 43.75 अंकांनी झेप घेतली आणि आज हा शेअर 994.75 रुपयांवर उघडला. त्याच वेळी, 10:05 वाजता हा शेअर 998.55 रुपयांवर व्यवहार करताना दिसला.