Adani vs Hindenburg संघर्षानंतर अदानी समूहाला मोठ्या आर्थिक आव्हांनाचा सामना करावा लागत आहे. समूहाला आपला FPO देखील मागे घ्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर निधी उभारण्यासाठी गौतम अदानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. Hindenburg ने अदानी ग्रुपविषयी अहवाल जाहीर केल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळू लागले होते. अदानी यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. त्यांचा जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील क्रमही घसरू लागला होता. अगदी काही दिवसांपूर्वी दुसऱ्या क्रमांकावर असणारे अदानी प्रथम 10 व्या क्रमांकाच्या बाहेर आणि त्यानंतर आणखीही त्यांचे स्थान घसरले होते.
दरम्यान, अदानी समूहाला आपला FPO ही मागे घ्यायला लागला होता. अदानी समूहासाठी हे धक्कादायक होते. कारण इतिहासतला मोठा FPO म्हणून चर्चेत आला होता. यातून मोठा निधी उभारला जाणार होता. अदानी ग्रुपसाठी (Adani Group) त्याच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी हा निधी महत्वाचा ठरणार होता. मात्र Hindenburg अहवालानंतर अदानी ग्रुपसाठी बाजारातील परिस्थिती प्रतिकूल बनत गेली होती. आणि अखेर हा FPO मागे घ्यायला लागला होता. या पार्श्वभूमीवर अंबुजा सीमेंटबाबत ही बातमी पुढे आली आहे. हे पुढील आठवड्यात कदाचित सोमवारच्या सुरुवातीला याची प्रक्रिया सुरू होऊ शकते असे वृत्त आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.
या प्रस्तावित दुय्यम विक्रीद्वारे 3 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्याचा विचार करण्यात येत आहे. कंपनीच्या 4.5 टक्के रकमेची इक्विटी ब्लॉक डीलद्वारे विकली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. सध्याच्या बाजार मूल्यावर आधारित हे 3380.7 कोटी रुपये उभारले जाऊ शकतात. मात्र अदानी समूहाच्या प्रतिनिधीने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.Holderind Investments Ltd आणि Endeavour Trade and Investment Ltd ही SPVs असून यांचा वापर अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि ACC लिमिटेडचे संपादन पूर्ण करण्यासाठी केला गेला. होल्डरिंडकडे अंबुजा सिमेंट्सची 63.18 टक्के इतकी मालकी आहे तर एंडेव्हरची 0.04 टक्के मालकी आहे. कंपनीतील संचयी प्रमोटर्सचा हिस्सा 63.22 टक्के इतका आहे.
Hindenburg अहवालानंतर बाजारातून कर्जे उभारणे अदानी समूहासाठी कठीण बनले होते. देशांतर्गत काही महत्वाच्या बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली होती. दरम्यान अदानी ग्रुपला आपला FPO सुद्धा रद्द करावा लागला होता. आता गेल्या काही दिवसांत अदानी समूहाच्या काही कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरीही सुधारताना दिसत आहे. Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समूहासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिलेले आहे. यातून बाहेर पाडण्यासाठी अदानी यांच्याकडून पाऊले उचलली जात आहेत.