बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने तिचा मित्र, फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे विद्यार्थी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. फाहादने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस स्टुडंट युनियनचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. ‘तनु वेड्स मनू’ (Tanu Weds Manu) आणि ‘रांझना’ (Raanjhanaa) यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. स्वरा समकालीन आणि राजकीय विषयांवरही मोकळेपणाने बोलत असते. ट्विटरवर कायम सक्रीय असणाऱ्या स्वराचे लाखो फॉलोवर्स आहेत. स्वराने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
स्वरा आहे करोडो रुपयांची (Swara Bhaskar Net Worth) मालकीण!
स्वराची अभिनय आणि काम करण्याची शैली लोकांनी पसंत केली आहे. स्वरा भास्कर चित्रपट आणि जाहिरातींमधून करोडोंची कमाई करते. स्वरा भास्कर ही बॉलीवूड अभिनेत्री असून तिच्या अभिनयाच्या जोरावर गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. स्वरा भास्करचा जन्म 9 एप्रिल 1988 रोजी झाला. स्वराचे वडील भारतीय नौदलाचे अधिकारी होते, तर तिची आई इरा भास्कर या दिल्लीतील जेएनयूमध्ये प्राध्यापक आहेत. स्वराने 2009 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’मध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. तीने आपल्या करिअरमध्ये ‘तनु वेड्स मनू’सोबत ‘रांझना’, ‘प्रेम रत्न धनपायो’ (Prem Ratan Dhan Payo), ‘वीरे दी वेडिंग’ (Veere Di Wedding), यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोबतच स्वरा भास्कर करोडोंची मालकीण आहे आणि ती आलिशान जीवन जगते. चला तर स्वरा भास्करच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
स्वरा भास्करची एकूण संपत्ती किती आहे?
दिल्लीत जन्मलेली स्वरा भास्कर आज करोडो रुपयांची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये स्वराची एकूण संपत्ती सुमारे $5 दशलक्ष होती. भारतीय चलनामध्ये विचार केला तर सुमारे 35 कोटींची तिची मालमत्ता आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती विविध जाहिरातींमधूनही करोडोंची कमाई करत असते. रिपोर्ट्सनुसार, ती एका चित्रपटासाठी किमान 4-5 कोटी रुपये घेत असते. कमाईच्या बाबतीत स्वराने मोठमोठ्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. स्वरा भास्करच्या कमाईचा स्रोत चित्रपटांच्या फीव्यतिरिक्त जाहिरात देखील आहे. स्वराने ‘तनिष्क’, ‘फॉर्च्यून ऑइल’, ‘स्प्राईट’, ‘आयोडेक्स’ इत्यादी अनेक लोकप्रिय ब्रांडच्या जाहिराती केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वरा एका चित्रपटासाठी सुमारे पाच कोटी रुपये घेते.
करोडोंच्या फ्लॅटमध्ये राहते स्वरा
स्वरा भास्करचे दिल्लीत एक आणि मुंबईत एक घर आहे. स्वराचे कुटुंबीय दिल्लीतल्या घरात राहतात. स्वराचे वडील सी. उदय भास्कर (C. Uday Bhaskar) हे भारतीय नौदलात अधिकारी होते, तर तिची आई इरा भास्कर (Era Bhaskar) या जेएनयूमध्ये प्राध्यापक (JNU Professor) आहेत. ती राहत असलेल्या 3 बीएचके फ्लॅटची किंमत करोडोंची असल्याचे सांगण्यात येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वराकडे BMW X1 सीरीजची कार देखील आहे, जी ती अनेकदा चालवताना आढळली आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी काही चारचाकी वाहने आहेत. चित्रपटांतील यशाच्या जोरावर स्वराने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. स्वराने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2009 मध्ये आलेल्या ‘कीप वॉकिंग’ या चित्रपटातून केली होती. 2010 मध्ये, ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ चित्रपटातही एका विशेष भूमिकेत दिसली होती, तरी या अभिनेत्रीला ‘तनु वेड्स मनू’ मधूनच योग्य ओळख मिळाली होती.