Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ACT Fibernet यूजर्स आता विनामूल्य घेऊ शकतात Netflix चा आनंद, डिटेल्स घ्या माहीत करून

ACT Fibernet

ACT Fibernet यूजर्स आता विनामूल्य Netflix चा आनंद घेऊ शकतात. याविषयीचे डिटेल्स जाणून घेऊ.

ACT Fibernet ब्रॉडबँड कंपनी लॉन्ग टर्म योजनांवरील ग्राहकांना Netflix बेसिक प्लॅनमध्ये मोफत प्रवेश देणार आहे.  मोफत Netflix ऑफर सर्व शहरांतील ग्राहकांना विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी तसेच ACT स्ट्रीमिंग बंडलवर स्विच करणार्‍यांना लागू असणार आहे. मात्र यात एक बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ती अशी की, यूजर्सना फक्त नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनमध्ये विनामूल्य प्रवेश मिळेल, ज्याची किंमत प्रति महिना 199 रुपये इतकी आहे आणि यूजर्सना एका वेळी एकाच डिव्हाइसवर कंटेन्ट पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.

ACT च्या मोफत Netflix बंडल प्लॅनची किंमत हैदराबाद आणि दिल्लीमध्ये 799 रुपये प्रति महिना आणि चेन्नईमध्ये 820 रुपये असणार आहे.  जर तुम्ही विद्यमान ACT Fibernet ग्राहक असाल आणि Netflix Basic वरून Netflix Standard प्लॅनमध्ये अपग्रेड करू इच्छित असाल, तर तुम्हाला फक्त रु. 300 ची फरकाची  रक्कम भरावी लागेल. जे लोक Netflix Basic वरून Netflix Premium वर अपग्रेड करू इच्छितात त्यांना 450 रु. शेल आऊट करावे लागेल. ही रक्कम तुमच्या ACT ब्रॉडबँड बिलाचा भाग म्हणून दिली जाऊ शकते.

ज्या यूजर्सनी  आधीच Netflix चे थेट सदस्यत्व घेतले आहे ते ACT स्ट्रीमिंग बंडलवर स्विच करून आणि कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Netflix Basic मिळवून आणि नंतर प्रीमियम किंवा मानक योजनेसाठी कमी खर्च देऊन पैसे वाचवू शकतात.

Netflix ने घेतला होता एक महत्वाचा निर्णय 

भारतात नेटफ्लिक्स खात्यावर अनेक यूजर्स लॉग इन करतात.  यामुळे कंपनीचे नुकसान होते, असे लक्षात आल्याने अलीकडेच Netflix कडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला.  याद्वारे आता कंपनी लॉगिन पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 
वॉशिंग्टन जर्नलने 2023 पासून  यूजर्सना पासवर्ड शेअर करण्याची असणारी परवानगी मागे घेणार असल्याचे वृत्त दिले होते.  अचानक लागू करण्याऐवजी कंपनी हळूहळू किंवा टप्प्याटप्प्याने नवीन नियम लागू करू शकते, असे यावेळी सांगितले गेले. कंपनीचे म्हणणे होते  की,  पासवर्ड शेअरिंग काढून टाकणे ग्राहकांसाठी चांगले नसले तरी यामुळे कंपनीचे बरेच नुकसान होताना दिसत आहे. मात्र याचा Netflix च्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होईल असे त्यावेळी म्हटले गेले.