Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

‘IIFL होम फायनान्स’मध्ये अबुधाबी प्राधिकरणाची 20 टक्के गुंतवणूक

ADIA iifl

आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) या कंपनीकडून भारतातील गृहनिर्माण वित्त क्षेत्रातील आयआयएफएल (IIFL Home Finance) कंपनीत केलेली ही सर्वात मोठी इक्विटी गुंतवणूक (Equity Investment) मानली जात आहे.

भारतातील गृहनिर्माण क्षेत्रातील आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडने (IIFL Home Finance Limited) अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) च्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीकडून 20 टक्के गुंतवणुकीद्वारे 2200 कोटी रूपयांचे प्राथमिक भांडवल उभारण्यासाठी करार केला आहे. 

आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA)द्वारे भारतातील परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त क्षेत्रातील ही सर्वात मोठी इक्विटी गुंतवणूक असणार आहे. आयआयएफएल होम फायनान्सने गृहकर्जाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची योजना कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

भागीदारीचा आनंद

आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड समुहाचे (IIFL Home Finance Limited) संस्थापक निर्मल जैन यांनी, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) सोबत हा भागीदार करार होताना आनंद होत असल्याचे म्हटले आहे. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी दोन्ही भागीदार वचनबद्ध असून यातून व्यवसाय वाढविण्यास पाठबळ मिळेल. या गुंतवणुकीमुळे आयआयएफएल होम फायनान्सची भारतातील सर्वात मोठी परवडणारी गृह कर्जे पुरवठादारांपैकी एक कंपनी म्हणून ओळखली जाते.

आयआयएफएल फायनान्स कंपनी

2006 मध्ये स्थापन झालेल्या आयआयएफएल फायनान्स या कंपनीची आयआयएफएल होम फायनान्स ही उपकंपनी आहे. या उपकंपनीने 31 मार्च, 2022 पर्यंत 23,617 कोटी रूपयांची मालमत्ता उभी केली आहे. कंपनीचे देशातील 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1,68,000 सक्रिय ग्राहक आहे. तर 200 शाखांमधून 3,200 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

आयआयएफएल होम फायनान्स कंपनी लहान-मोठ्या गृह प्रकल्पांना कर्ज पुरवते, बांधकामासाठी तसेच मालमत्तेवर कर्ज उपलब्ध करून देते. तसेच आयआयएफएल कंपनी आपल्या मालकीच्या ‘कुटुंब’ या प्रकल्पाद्वारे गृहनिर्माण विकासक आणि इतर तज्ज्ञांच्या मदतीने देशात प्रदूषणविरहित परवडणाऱ्या इमारतींच्या बांधकामास समर्थन देते.