Aadhar-Pan Link: तुम्ही 30 जून पूर्वी किंवा इन्कम टॅक्स विभागाने दिलेल्या मुदतीत आधार आणि पॅनकार्ड लिंक (Aadhar - Pan Card Link) केलेले नाही. त्यामुळे तुमचे पॅनकार्ड आता काम करत नाही. त्यामुळे तुम्हाला पॅनकार्डशी संबंधित काही कामे करता येत नाहीत. पण तुम्ही चिंता करू नका. पैशांशी संबंधित काही व्यवहार तुम्ही नक्कीच करू शकता. पण यासाठी तुम्हाला सरकारला जास्तीचा टॅक्स द्यावा लागेल.
इन्कम टॅक्स कायद्यातील 206AA कलम काय सांगते?
पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यामुळे तुम्ही आता बँकेतील मुदत ठेवी किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. तसेच तुम्हाला टॅक्स रिफंड येणार असेल तर तोही मिळवता येत नाही. पण इन्कम टॅक्स कायद्यातील 206AA कलमानुसार, जर तुम्हाला एखाद्याला विशिष्ट रक्कम द्यायची आहे. त्यावेळी त्यातून टीडीएस कपात करणे गरजेचे असते. त्यावेळी त्यातून एक ठराविक टक्के रक्कम काढता येते. पण तुमच्याकडून संबंधित व्यक्तीला पॅनकार्ड दिला गेला नाही तर ते, त्या रकमेतून जास्त रक्कम कपात करू शकतात. याचे प्रमाणे जवळपास 20 टक्क्यांपर्यंत आहे. हे फक्त तेव्हाच होऊ शकते. ज्यावेळी तुमचे पॅनकार्ड काम करत नसेल किंवा तुमच्याकडे पॅनकार्डच नसेल. त्यामुळे जास्त टॅक्स लागू नये यासाठी पॅनकार्ड खूप गरजेचे आहे.
206AA कलमानुसार 20 टक्के टॅक्स लागू शकतो
त्याचबरोबर इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 206CC मध्ये एखाद्याला रक्कम स्वीकारताना त्यावर टॅक्स लागू करण्याबाबत सूचित करते. अशावेळी त्या व्यक्तीला पॅनकार्ड दिला गेला नाही किंवा पॅनकार्ड ॲक्टीव्ह नसेल तर त्याच्याकडून जास्त टॅक्स वसूल करता येतो. यापूर्वी अशापद्धतीने पेमेंट केल्यास त्यावर सर्वसाधारण टॅक्सपेक्षा दुप्पट किंवा 5 टक्के टॅक्स वसूल करण्याचा नियम होता. पण 1 जुलैपासून आता त्यावर 20 टक्क्यांपर्यंत टॅक्स आकारला जाऊ शकतो. अशावेळी पॅनकार्ड दिल्यास तुमच्याकडून अतिरिक्त टॅक्स घेतला जात नाही.
पॅनकार्ड ॲक्टिव्ह नसतानाही तु्म्ही खालील व्यवहार करू शकता
- जर तुम्हाला एका आर्थिक वर्षात बँकेतील मुदत ठेवी किंवा आरडीमधून 40 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाले असेल तर तुम्हाला जास्तीचा टीडीएस भरून हा व्यवहार करता येतो.
- एका आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडातून 5 हजारांपेक्षा अधिक लाभांश (Dividend) मिळत असेल तर पॅनकार्ड नसल्यास तुम्हाला जास्त टीडीएस द्यावा लागेल.
- घर किंवा जमीनीच्या विक्रीतून किंवा स्टॅम्प पेपरची फी 50 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जास्तीचा टीडीएस द्यावा लागणार.
- जर तुम्ही गाडी विकत घेताना त्याचे पेमेंट 10 लाखापेक्षा जास्त करत असाल तर तुम्हाला त्यावर जास्तीचा टीसीएस भरावा लागेल.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्यावर अधिक टीडीएस भरावा लागतो.
- जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात आणि तुमचे महिन्याचे भाडे 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जास्तीचा टीडीएस द्यावा लागेल.
- जर तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेतली असेल आणि त्याचे मूल्य 50 लाखापेक्षा जा्त असेल तर तुम्हाला त्यावर जास्तीचा टीडीएस द्यावा लागेल.
अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीकडे पॅनकार्ड नसेल तर ती व्यक्ती वरीलप्रमाणे पैशांचे व्यवहार करू शकते. पण त्यासाठी संबंधित व्यक्तीला जास्तीचा टॅक्स भरावा लागतो. शिक्षण किंवा मेडिकलवर होणाऱ्या खर्चात सरकार सवलत देत असते. पण त्यासाठी तुमच्याकडे योग्य कागदपत्रे किंवा पुरावे नसतील तर तुम्हाला अधिकचा टॅक्स भरून ती सेवा घ्यावी लागते.