आधार-पॅनकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून होती. ज्या नागरिकांनी अद्यापही पॅन-आधार लिंक केले नसेल त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय केले जाईल, असे आयकर विभागाने म्हटले आहे. नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती सरकारकडे रहावी, तसेच कर चुकवेगिरी होऊ नये म्हणून ही दोन्ही कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही कोट्यवधी नागरिकांनी पॅन आधार लिंक केले नाही.
पॅन अॅक्टिव्ह नसेल तर कोणते व्यवहार करता येणार नाहीत?
1) बँक, कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत खाते उघडता येणार नाही. (सर्वसामान्य बचत आणि टाइम डिपॉझिट खाते सोडून)
2) क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी अर्ज करता येणार नाही.
3) डिमॅट खाते सुरू करता येणार नाही.
4) हॉटेलमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त रकमेचे बिल कॅशमध्ये देता येणार नाही.
5) परदेशात जाताना 50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा कॅश व्यवहार. किंवा परदेशी चलन 50 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी करता येणार नाही.
6) म्युच्युअल फंडचे 50 हजारांपेक्षा जास्त युनिट्स खरेदी करता येणार नाहीत.
7) एखाद्या कंपनी किंवा संस्थेकडून 50 हजार मुल्यापेक्षा जास्त रकमेचे रोखे किंवा डिबेंचर्स खरेदी करता येणार नाही.
8) रिझर्व्ह बँकेने जारी केलेले 50 हजार मुल्यापेक्षा जास्त रकमेचे बाँड खरेदी करता येणार नाहीत.
9) बँकेत एका दिवसात 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही.
10) बँक ड्राफ्ट किंवा बँकर्स चेकसाठी एका दिवसात 50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा कॅश व्यवहार करता येणार नाही.
11) 50 हजार रुपयांपेक्षा जास्त टाइम डिपॉझिटचे व्यवहार बँक, को-ऑपरेटिव्ह वित्त संस्थेत करता येणार नाही.
12) 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ड्राफ्ट, कॅश, चेक पेमेंट प्री-पेड बँकिंग व्यवहारासाठी करता येणार नाहीत.
13) 50 हजार रुपयांपेक्षा जास्त लाइफ इन्शुरन्स प्रिमियम एका वर्षात भरता येणार नाही.
14) शेअर वगळता 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख्यांचे विक्री व्यवहार करता येणार नाहीत.
15) शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या कंपनीसोबत 1 लाख रुपयांचे शेअरचे खरेदी-विक्री व्यवहार करता येणार नाहीत.