भारतात सर्व सरकारी योजनांसाठी व प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवेशापासून ते अगदी बॅंकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड लागते. कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हा आता महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्डवर संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, वय आणि जन्मदिनांक असते. ही माहिती अचूक असणे गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मिळणाऱ्या लाभामध्ये अडचणी येऊ शकतात.
आधार कार्डावरील तुमची एखादी माहिती चुकीची असल्यास तुम्ही ती घरबसल्या ऑनलाईन दुरूस्त करू शकता. आधारच्या वेबसाईटवरून तुम्ही सहज बदलू शकता. याचे टप्पे आपण समजून घेऊयात.
आधार कार्डवरील माहिती ऑनलाइन कशी अपडेट करायची
आधार कार्डवरील पत्ता, नाव, जन्मतारीख आणि लिंग हे ऑनलाईन बदलण्यासाठी किंवा दुरूस्त करण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करा.
- सर्वप्रथम आधारच्या UIDAI वेबपोर्टलला भेट द्या.
- वेबसाईटवरील Proceed to update Address यावर क्लिक करा.
- तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाका.
- तुमच्या अधिकृत मोबाईलवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून लॉग-इन करा.
- आता इथे सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करा.
- तुमच्याकडे पत्त्याचा आवश्यक पुरावा नसेल तुम्हाला Request for Address Validation Letter ही प्रक्रिया पार पाडावी लागेल.
- यात आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्याची विनंती केली जाते.
- त्यानंतर आधार यंत्रणेकडून पत्ता अपडेट केला जातो.
- अपडेट केलेल्या नवीन आधार कार्डसाठी 50 रूपये शुल्क भरावे लागते. ते तुम्ही ऑनलाईन डेबिट/क्रेडिट किंवा नेट बॅंकिंगने भरू शकता.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खालीलपैकी 1 पुरावा आवश्यक
पोस्टाचे / बॅंकेचे पासबुक
पासपोर्ट
रेशन कार्ड
मतदार ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
विजेचे / पाण्याचे / गॅसचे / टेलिफोनचे बिल
प्रॉपर्टी टॅक्सची पावती
इन्श्युरन्स पॉलिसी
नरेगा जॉब कार्ड
किसान पासबुक
खासदार / आमदार / राजपत्रित अधिकाऱ्यांनी जारी केलेला पत्ता
इथे दिलेल्या अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने घरात बसून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता. आधार कार्डवरील तुमच्या नावातील बदल, जन्मतारीख, इमेल आयडी आणि पत्ता बदलू शकता.