Pranjali Awasthi: अवघ्या 16 वर्षांच्या प्रांजली अवस्थीने आपल्या स्वत:च्या मेहनतीने असा एक स्टार्टअप सुरू केला आहे. ज्याची सध्या मार्केटमध्ये खूप चर्चा सुरू आहे. प्रांजलीने जानेवारी, 2022 मध्ये टेक्नॉलॉजीशी संबंधित स्टार्टअप सुरू केला होता. हे स्टार्टअप दोन महिन्यांनी आपले दुसरे वर्ष पूर्ण करणार आहे. पण त्यापूर्वीच त्याने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.
प्रांजलीने जानेवारी, 2022 मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधील रिसर्च आणि डेटाशी संबंधित काम करणारी कंपनी सुरू केली होती. कंपनी सुरू केली तेव्हा प्रथमच तिच्याकडे 3.7 कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. त्याच्या आधारावर सुरू केलेल्या या कंपनीने अवघ्या दोन वर्षांच्या कारकार्दीत 100 कोटींचा टर्नओव्हर गाठला आहे. सध्या तिच्या कंपनीत 10 कर्मचारी काम करत आहेत.
टेक्नॉलॉजीची आवड प्रांजलीला खूप कमी वयातच लागली होती. या क्षेत्रातील तिचे आयडॉल तिचे वडिलच असून, ते स्वत: एक इंजिनिअर आहेत. प्रांजली जेव्हा 7 वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला कोडिंग फिल्डमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. त्यानंतर 11व्या वर्षी ती आणि तिचे कुटुंब अमेरिकेला शिफ्ट झाले. तिथे टेक्नॉलॉजीचे मोठे दार तिच्यासाठी ओपन झाले. मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये मशीन लर्निंग प्रोजेक्टसवर इंटर्नशीप केली.
इंटर्नशीपमध्ये प्रांजलीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून कोणत्या गोष्टीवर काम करता येऊ शकते, याची प्रचिती आली आणि त्यातून प्रांजलीने Delv.AI कंपनीची मागच्यावर्षी स्थापना केली.