Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startupच्या Investmentमध्ये 82 टक्क्यांची घट, गुंतवणूक मिळवण्यासाठी काय पूर्वतयारी करावी?

business pitch to investors

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये Startupची संख्या वाढली आहे. स्टार्टअपच्या नावीन्यपूर्ण संकल्पना, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये पैसे घालण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आणि फायनॅन्स कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, परंतु या वर्षात गुंतवणूक दर 82 टक्क्यांनी घटला आहे. अशावेळी गुंतवणूक मिळावी म्हणून आपले पीच प्रभावशाली कसे करावे याच्या टिप्स या लेखात तुम्हाला वाचता येतील.

भारत जगातला सर्वात मोठा तिसरा स्टार्टअप इकोसिस्टीम (Startup Ecosystem) असलेला देश बनला आहे. तर, इनोव्हेशन (Innovation) स्टार्टअपमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतातील एकूण स्टार्टअपपैकी 44 टक्के स्टार्टअप हे विविध क्षेत्रातील समस्या निवारणावर काम करत आहेत. ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील 656 जिल्ह्यांमधून 77 हजार स्टार्टअपची नोंदणी झाली आहे, असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने नुकतेच जाहीर केले असल्याचे इन्व्हेस्ट इंडियाने आपल्या माहितीत दिले आहे.

स्टार्टअपची संख्या कमालीची वाढत आहे. या स्टार्टअप कंपन्यांना जानेवारी 2022 पर्यंत  460 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. परंतु, 2022 वर्षाचा शेवट येत आहे तरी गुंतवणुकीची संख्या वाढलेली नाही, उलट 82 टक्क्यांनी गुंतवणुकीचा दर घटला आहे. यामागील कारणे म्हणजे, बऱ्याचदा स्टार्टअपकडे संकल्पना चांगल्या असतात परंतु व्यवसाय करता येत नाही यामुळे कंपनी तोट्यात जाते. अनेकदा स्टार्टअप कंपनी भविष्यातील नफ्याच्या आकड्यांचा फुगवटा बनवते आणि प्रत्ययक्षात काहीच व्यवसाय झालेला नसतो. तसेच काहीवेळा गुंतवणुकदारांकडून घेतलेला पैसा नेमका कुठे वापरायचा हे कळत नाही, व्यवसाय नेमका कसा वढवावा हे लक्षात येत नाही अशा अनेक कारणांमुळे फायनॅन्स कंपन्या, एंजल इन्व्हेस्टर आदींना मोठा फटका बसतो. मागील काही वर्षांत असे अनुभव आल्यामुळे आणि संपूर्ण जगात मंदीसदृष्य वातावरण तयार झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी स्टार्टअप गुंतवणुकीतून काढता पाय घेतला असल्याचे, एंजल इन्व्हेस्टर आणि बिझनेस डेव्हल्पमेंट एडव्हायझर असमी त्रिवेदी यांनी सांगितले.

स्टार्टअप कंपन्यांचे फंडींग कमी झाले असले तरी अनेक फायनॅन्स कंपन्या गुंतवणूक करत आहेत. यासाठी ते कंपन्यांच्या टीमसोबत किमान 3 राऊंड्स घेत आहेत, ज्यात ते कंपनीची स्टार्टअपची माहिती, फाऊंडर्सची माहिती, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचा तपशील तपासून घेत आहेत. तसेच फायनॅन्स कंपन्या लिमिटेड गुंतवणूक करण्याचा ट्रेंड आणत आहेत. यात काही कंपन्यांनी विशिष्ट रक्कमच केवळ स्टार्टअपसाठी गुंतवायची असे ठरवले आहे, तर काही कंपन्यांनी केवळ पाच निवडक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायची असे ठरवलेले आहे, ही माहिती त्रिवेदी यांनी दिली.

या एकूण स्थितीत स्टार्टअप कंपन्यांनी पूर्वतयारी करून चांगले पीच बनवून, गुंतवणुकदारांवर कसा प्रभाव पाडावा यासाठीच्या काही खास टिप्स असम त्रिवेदी यांनी आपल्या महामनीच्या वाचकांसाठी दिल्या आहेत.

प्रभावशाली Business Pitch कसे द्यावे?

  • गुंतवणुकदारांची माहिती काढा (Extract investor's information): ज्या फायनॅन्स कंपनीकडे किंवा एंजल इन्व्हेस्टरकडे मिटींग ठरली असेल, त्यांची आधी माहिती काढा. त्या कंपनीने पूर्वी कोण कोणत्या क्षेत्रातल्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे याबद्दल समजून घ्या. तुमचा स्टार्ट त्यात बसतो की नाही बसत हे पाहा. समजा, तुमचा स्टार्टअप वेगळ्या क्षेत्रातील असेल आणि तरी त्यांनी तुमची मिटिींगसाठी निवड केली असेल तर नक्कीच त्यांना विविध क्षेत्रात हात पाय पसरायचे आहेत. त्या दृष्टीने तुमचे स्टार्टअप किती महत्त्वाचे, या क्षेत्रात काय योगदान देणारे आहेत आदी मुद्दे पीचमध्ये हायलाईट करा. 
    जर, तुमचे स्टार्टअप त्याच क्षेत्रातले असेल ज्यात त्यांनी पूर्वी गुंतवणूक केली आहे, तर तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये काय वेगळेपण आहे हे हायलाईट करा. हे करण्यासाठी तुमच्या गुंतवणुकदाराची सर्व माहिती काढणे आवश्यका आहे.
  • पीच ठेवा, शॉर्ट अँड क्रिस्प (Keep the peaches, short and crisp): तुम्हाला पीच करताना नेमके काय बोलायचे आहेत, कोणते मुद्दे मांडायचे आहेत ते आधी लिहा. त्यानुसार तुमच्या पीचचे मुद्दे किंवा पीच पूर्ण लिहा, मात्र ती पाठ केल्यासारखी प्रेझेंट करू नका. पीच लिहिल्याने तुमच्या डोक्यातील गोंधळ क्लिअर होईल आणि नेमके ठळक मुद्दे तुमच्या लक्षात येतील.
    पीच शॉर्ट आणि क्रिस्प ठेवा. 2013 नंतर लहान बिझनेस पीचचा ट्रेंड आलेला आहे. 15 सेकंदांमध्ये तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करा. याला मेसेज मॅपिंग म्हणतात. त्यानंतर पुढील पीचमध्ये तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमधील नावीन्यपूर्ण बाब, त्याची बाजारात असलेली गरज, ते का लोकप्रिय होऊ शकेल, ब्रँड डेव्हलप करण्यासाठी तुमचा प्लॅन काय या गोष्टी त्यात येऊ द्या. मुख्य म्हणजे साध्या सोप्प्या भाषेत बोला अजिबात जड शब्दांचा वापर करू नका, गुंतवणुकदारानेमध्येच काही म्हटले तर नीट ऐकून घ्या आणि त्यावर प्रतिक्रिया द्या, घाई करू नका.
    तसेच पीच देताना फंबल होऊ नका, आत्मविश्वासाने बोला, तुमच्या एकूण देहबोलीत इझ असू द्या. यासाठी आधी घरातील किंवा कार्यालयातील व्यक्तींसमोर प्रेझेंटेशनचा सराव करा.
  • असे बनवा प्रेझेंटेशन (How to make a presentation): पीच डीलिव्हर करतानासोबत एक पीपीटी प्रेझेटेशन बनवा. तुमच्या प्रोडक्टचे सँपल न्या, सर्व्हिस असेल तर त्याचा डेमो व्हिडीओ दाखवा, प्रत्यक्ष अनुभव दाखवण्याजोगा असेल तो अनुभव गुंतवणुकदारांना नक्की द्या.
    प्रेझेंटनमध्ये नुसता मजकूर न देता, त्यात ग्राफिक्स, व्हिडीओ, अॅनिमेशन आदींचा समावेश करा. त्याचबरोबर यात व्हॉईस आणि म्युझिकचा अवश्य समावेश करा. प्रेझेंटेशनच्या प्रत्येक स्लाईडवरुन पुढे जाताना तो मुद्दा अर्धवट सोडू नका किंवा त्यावर समोरील व्यक्तींचे समाधानकारक प्रतिक्रिया आल्यावर सांगून पुढे जा. याने तुमचे प्रेझेंटशन किंवा एकूण पीच अधिक प्रभावशाली बनेल.
  • तुम्हाला पैशांचे महत्त्व आहे हे दाखवा (Show that you value money): गुंतवणुकदाराकडून पैसे मागताना जी रक्कम सांगाल, तिचे जस्टीफिकेशन द्या. ते पैसे कुठे, कसे वापरणार ते सांगा. त्याचा प्लॅन घेऊन गेलात तर उत्तमच! यातून तुम्हाला पैशांचे महत्त्व आहे हे लक्षात येते. 
    तसेच, तुमच्या स्टार्टअपच्या संर्व वर्षांच्या टर्नओव्हरची योग्य माहिती द्या, त्यासाठी तुम्ही किती, कसे पैसे गुंतवले हेही थोडक्यात सांगा.
    त्याचबरोबर तुमच्या स्टार्टअपच्या सध्याच्या स्थितीनुसार आणि पुढील पाच वर्षांच्या व्यवसाय ध्येयानुसार तुम्ही योग्य रक्कम मागत आहात आणि योग्य शेअर देत आहात याविषयी प्रश्न विचारण्याआधी आवर्जून बोला.
  • निगोसिएशनशी डील करण्याची पूर्वतयारी (Preparation for Dealing with Negotiations): तुम्ही पीच चांगले द्याल, प्रभावीरित्या प्रेझेंट कराल मात्र अंतिम टप्प्यात तुमची कसोटी लागते. तुम्ही संपूर्ण पीचमधून समोरील व्यक्तीच्या खिशातील पैसे काढण्यासाठी त्याला किती इंप्रेस केले आहे ते लक्षात येते. विशेष म्हणजे गुंतवणुकदार निगोसिएशन करणार, त्यावेळी तुम्ही कशी उत्तरे द्याल, काय बोलाल यावर विचार करून ठेवा. 
    त्यांनी निगोशिएट केलेल्या किंमतीवर नम्रपणे प्रश्न विचारा, त्यांनी तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचा काय फायदा होईल हे पटवून द्या. निगोसिएशनशी डील करण्याची पूर्वतयार तुमच्या को फाऊंडरसोबत नक्की करा.

या काही टिप्स अंमलात आणून, चांगले पीच गुंतवणुकदारांसमोर देता येईल आणि तुमच्या स्टार्टअपसाठी गुंतवणूक मिळवता येईल.