Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

business start up: 10000 रूपयाच्या गुंतवणुकीतून सुरू करू शकता 'हे' 5 व्यवसाय

Business Start Up

Business Start Up: कमीत कमी गुंतवणूक (investment) करून व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे किमान 10,000 रुपये असतील, त्यातून सुद्धा तुम्ही व्यवसाय सुरू करून चांगले इन्कम घेऊ शकता, तर जाणून घ्या त्या व्यवसायांबद्दल.

Business Start Up: गेल्या तीन वर्षात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे लोकांना जीवन जगताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर बहुतांश लोकांनी आपले छोटे व्यवसाय सुरू केले आहे. तुम्हालाही गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे किमान 10,000 रुपये असतील, त्यातून सुद्धा तुम्ही व्यवसाय सुरू करून चांगले इन्कम घेऊ शकता, तर जाणून घ्या त्या व्यवसायांबद्दल. 

कोचिंग इन्स्टिट्यूट / ट्यूशन (Coaching Institute / Tuition)

कोरोना महामारीच्या (Covid -19) (Corona Pandemic)काळात शाळा बंद असल्याने सगळ्यांचा कल ट्यूशन क्लासेसकडे (Tuition classes) वाढला आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही समाजसेवा आणि इन्कम या दोन्ही बाबी करू शकता. तुम्ही सुशिक्षित असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय कमी गुंतवणुकीत (investment) उघडायचा असेल तर तुम्ही सहज कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करू शकता. त्यासोबतच तुम्ही तुमच्या घरी विद्यार्थ्यांना क्लासेस  देऊन सुरुवात करू शकता आणि वेळेनुसार त्यात वाढ करू शकता. आजकाल ट्यूशन संस्कृती खूप वाढली आहे कारण नोकरीसाठी स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे अनेक कोचिंग सेंटर्सही सुरू झाली आहेत. 

आईस्क्रीम पार्लर (Ice Cream Parlour)

आधी आईस्क्रीम फक्त उन्हाळ्यात मिळत होती, त्याला मागणी सुद्धा उन्हाळ्यातच होती. सध्याच्या काळात असे काही नाही, आता  हिवाळा, उन्हाळा, पावसाळा कोणताही ऋतु असो, आईस्क्रीमची मागणी असते. काहींना प्रत्येक ऋतूत आईस्क्रीम खायला आवडते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आईस्क्रीम पार्लर (Ice Cream Parlour) उघडले तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या परिसरातील परिस्थितीचा आढावा घेऊन तुम्ही हा व्यवसाय करू शकता. मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाची मदत घेऊ शकता.

मोबाईल रिचार्ज शॉप (Mobile Recharge Shop)

सध्याच्या काळात क्वचितच एखादा व्यक्ती असा मिळेल ज्याच्याकडे मोबईल नाही. मोबाइल असला की त्यात रीचार्ज करणे आलेच. त्यामुळे तुमच्या गावात किंवा शेजारील शहरात तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता.  यासाठी तुम्हाला एक छोटेसे दुकान घ्यावे लागेल. यानंतर तुम्ही लोकांचे मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge Shop)करू शकता. फोन पे गुगल पे मुळे आता प्रत्यक्ष दुकानात जाण्याची गरज नाही. कॉल करून सुद्धा तुम्ही तुमचे काम करू शकता. त्याच बरोबर विविध सेतुचे काम सुद्धा करू शकता. 

टिफिन सेवा (Tiffin service)

गावाकडची अनेक मुलं शहरात शिक्षणासाठी जातात. यावेळी जेवण्याची व्यवस्था करणे त्यांना कठीण जाते. घरगुती जेवणाचा स्वाद देऊन त्यांच्या जेवणाची सोय आणि तुमचे इन्कम या दोन्ही गोष्टी करू शकता. बाहेरगावी त्यांना घराबाहेर न जाता टिफिन मिळू शकेल. सध्या प्रत्येकाला घराबाहेर स्थलांतर करावे लागत आहे. काही शिक्षणासाठी तर काही नोकरीसाठी जातात, यातून तुम्ही अन्नदान आणि इन्कम दोन्ही करू शकता. 

कुकिंग क्लास  (Cooking class)

काहींना जेवण बनवण्याची आवड असते. साऊथ इंडियन, गुजराती, मराठी (South Indian, Gujarati, Marathi) आणखी वेगवेगळे जेवण बनवण्याची आवड असते. मग हे जेवण बनवायला कुठे शिकायच तर तेव्हा हा व्यवसाय तुम्ही सुरू करून सेवा देऊ शकता. तुमच्या आवडीशी संबंधित हा व्यवसाय तुम्हाला नोकरीत समाधान तर देईलच पण चांगले उत्पन्न मिळवण्यासही मदत करेल. यासाठी तुम्ही कुकिंग क्लास (Cooking class) उघडू शकता. ज्यामध्ये तुम्ही महिलांना आणि मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती बनवायला शिकवू शकता. प्रत्येकजण अन्न शिजवतो, परंतु चांगले अन्न शिजविणे ही देखील एक कला आहे.