यंदा साखरेच्या दरात विक्रमी वाढ पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांत साखरेचे उत्पन्न घातल्यामुळे येणाऱ्या काळात साखर खरेदी करताना सामान्यांना कडू अनुभव येऊ शकतो. गेल्या 6 वर्षांतील ही विक्रमी भाववाढ आहे. सध्या गेल्या 2 आठवड्यात साखरेच्या किंमतीत 6% पेक्षा जास्त भाववाढ झाली आहे, येणाऱ्या काळात ही भाववाढ अधिक होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.
Table of contents [Show]
मागणी जास्त, उत्पादन कमी
साखर हा तसाही सर्व घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. परंतु साखरेचे उत्पादन घटल्यामुळे बाजारात साखरेचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे ही भाववाढ केली जात आहे. यावर्षी महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांत देखील ऊसाची लागवड कमी प्रमाणात झाली. यामागे अनेक कारणे होती. बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे ऊस पिकाला मोठी हानी पोहोचली होती.
6 वर्षांतील सर्वात मोठी भाववाढ
कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतीने 6 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. ऊस उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारताचा विचार केला तर सर्वांत जास्त ऊस महाराष्ट्रात पिकतो तसेच देशातील सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्रातच आहेत. असे असले तरीही येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनतेला देखील साखर दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.
Sugar prices in India climb as production drops amid record demand
— ThePrintIndia (@ThePrintIndia) April 10, 2023
Rajendra Jadhav @Rajendra1857 reportshttps://t.co/nEd7mjOYEZ
युक्रेन-रशिया युद्ध संकटानंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतासह अनेक देश इथेनॉल बनवण्यासाठी उसाचा वापर वाढवू लागले आहेत. सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर केला जातो आहे. भारताने ग्रीन पॉवर मोहिमेअंतर्गत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल वापरण्यासाठी परवानगी दिली आहे.त्यामुळे पेट्रोलचे भाव कमी होतील असे म्हटले जात आहे. पेट्रोलसाठी इतर देशांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी उसाचा वापर असाच वाढल्यास साखरेचे उत्पादन घटत जाईल अशी शंका जाणकारांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात उत्पादनात घट
माध्यमांशी बोलताना बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, साखरेचे सर्वाधिक उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात उत्पादनात घट झाल्यामुळे साखरेचे दर वाढत आहेत. डीलर्सचा अंदाज आहे की महाराष्ट्रात 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या 2022/23 मार्केटिंग वर्षात पूर्वीच्या सुमारे 13.7 दशलक्ष टनांच्या तुलनेत सुमारे 10.5 दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत साखरेच्या किमती आणखी वाढतील कारण उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात साखरेची मागणी वाढत असते.
उन्हाळ्यात साखरेला मोठी मागणी
भारतात उन्हाळ्यात साखरेला मोठी मागणी असते. उन्हाळ्यात शीत पेय, आईस्क्रीमला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच लग्नसराई आणि सणासुदीला देखील गोडधोड बनवलं जातं. यामुळे उन्हाळ्यात साखरेला मोठी मागणी असते. मागील वर्षी महाराष्ट्रात साखरेला 3150-3225 रुपये क्विंटल भाव मिळाला होता. यावर्षी मात्र 3573-3712 रुपये क्विंटल भावाने साखर विकली जात आहे.
Source: https://rb.gy/9q1ai