प्राप्तीकर विभागाने एक महत्वाची माहिती करदात्यांसमोर सादर केली आहे. या माहितीनुसार गेल्या आठ वर्षांत करदात्यांच्या एकूण उत्पन्नात 56% वाढ झाली असल्याचे निरीक्षण प्राप्तीकर विभागाने नोंदवले आहे.होय, याचाच अर्थ गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत जे नागरिक नियमितपणे कर भरणा करत होते त्यांच्या उत्पन्नात सरासरी 56 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. याचाच अर्थ करप्राप्त उत्पन्नात वाढ झाल्यामुळे प्राप्तीकर विभागाच्या महसुलात देखील वाढ झाली आहे.
प्राप्तीकर विभागाने आपल्या सोशल मिडिया खात्यावरून ही माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, 2013-14 या आर्थिक वर्षात करदात्यांचे वार्षिक उत्पन्न सरासरी 4.5 लाख रुपये इतके नोंदवले गेले होते. त्यांनतर 2021-22 या आर्थिक वर्षात करदात्यांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नात वाढ नोंदवली गेली असून, हे उत्पन्न 7 लाखांपर्यंत असल्याचे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे.
Income Tax Department's focus on measures to ensure ease in compliance for taxpayers yields positive results! Direct Tax data shows improved Taxpayer compliance!
— Income Tax India (@IncomeTaxIndia) October 26, 2023
✅No. of ITRs filed by individual taxpayers grows from 3.36 crore in AY 2013-14 to 6.37 crore in AY 2021-22… pic.twitter.com/moSQ2ubbUD
करदात्यांच्या संख्येत वाढ
करदात्यांच्या उत्पन्नात एकीकडे वाढ होत असताना करदात्यांच्या संख्येत देखील वाढ नोंदवली गेली आहे. उपलब्ध माहितीनुसार 2013-14 या आर्थिक वर्षात 3.36 कोटी नागरिकांनी प्राप्तीकर भरला होता तर 2021-22 या आर्थिक वर्षात 6.37 कोटी नागरिकांनी कर भरला आहे. करदात्यांच्या संख्येत वाढ म्हणजे नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होय.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करदात्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचे हे द्योतक आहे.
7.41 कोटी रिटर्न भरले
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 साठी आतापर्यंत 7.41 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले गेले आहेत.रिटर्न भरणाऱ्या नागरिकांमध्ये 53 लाख लोकांनी पहिल्यांदाच रिटर्न फाईल केले आहे. दरवर्षी नव्याने करदाते प्राप्तीकर विभागाकडे कर भरणा करत आहेत.