रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील एक महत्वाची अशी एक कंपनी आहे. सध्या मुकेश अंबानी यांच्या हाती या उद्योगाची सूत्रे असून वेगवगेळ्या क्षेत्रात हा उद्योगसमूह कार्यरत आहे. एवढेच नाही तर रिलायन्सने गुतंवणूक क्षेत्रात, भारतीयांना आर्थिक सेवा देण्यासाठी अमेरिकेतील दिग्गज अशा ब्लॅकरॉक कंपनीशी नुकताच करार केलाय. या पार्श्वभूमीवर रिलायन्स उद्योगसमुहातून एक महत्वाची बातमी समोर येते आहे.आर्थिक वर्ष 2023 मध्ये रिलायन्स उद्योगसमूहातील जवळपास 1,67,391 कर्मचाऱ्यांनी कंपनीला राम राम ठोकला आहे. यापैकी 41,818 कर्मचारी रिलायन्स जिओमध्ये आणि 1,19,229 कर्मचारी रिलायन्स रिटेल नेटवर्कमध्ये काम करत होते. मुखत्वे रिलायन्सच्या मोबाईल कम्युनिकेशनच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनी सोडली आहे.
एकीकडे जगभरात भल्याभल्या नेटवर्क क्षेत्रातील कंपन्या कामगारांना कामावरून काढून टाकत असताना रिलायन्स मधील कर्मचारी मात्र स्वतःहून राजीनामा देत आहेत.
Reliance Retail & Jio see 64.8% spike in voluntary attrition, with 1,67,391 employees leaving during FY23.
— Benzinga India ?? (@BenzingaIndia) August 9, 2023
Hiring trends show a rise too, with 2,62,558 hires. Chairman Mukesh Ambani emphasizes digital empowerment and expanding retail offerings. #Reliance #EmployeeAttrition pic.twitter.com/A9nhOahEt7
काय घडलं?
रिलायन्स जिओमधील 41,818 कर्मचाऱ्यांनी पहिल्या सहामाहीत राजीनामा का दिला असेल याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती केली. जवळपास 70,418 लोकांना कंपनीने कामावर घेतले. कंपनीच्या अहवालानुसार जिओमध्ये एकूण 95326 कर्मचारी काम करतात. यापैकी थोडेथोडके नाही तर तब्बल 41,818 कर्मचाऱ्यांनी कंपनीला रामराम ठोकला आहे.
या आकडेवारीचा हिशोब लावला असता मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीचा स्वच्छेने राजीनामा देण्याच्या प्रकरणात 64.8 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.
कर्मचाऱ्यांनी का सोडली जिओची साथ?
खरे तर जिओने देशभरात 5G सेवा देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार होते. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत त्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली. मात्र या क्षेत्रात एयरटेलने देखील उडी घेतल्यानंतर जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. एवढेच नाही तर इतर टेलिकॉम कंपन्यांनी देखील त्यांचा सेवा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती केली आहे. सध्या बीएसएनएल देखील 4 जी सेवा देण्यासाठी सज्ज झाली असून त्यांना देखील कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढल्यामुळे इतर कंपन्यांमध्ये कर्मचारी चांगल्या पगार देणाऱ्या नोकरीच्या शोधात आहेत.