मुंबईत होणाऱ्या विमेन्स प्रीमिअर लीगसाठी (Women Premier League 2023) सोमवारपासून (दि. 13 फेब्रुवारी) लिलाव प्रक्रिया सुरू झाली. या लिलावात तब्बल 409 महिला क्रिकेट खेळाडुंचा सहभाग असून यातील 90 महिला खेळाडुंचा लिलाव होणार आहे. यात आतापर्यंत 26 खेळाडुंवर 39.65 कोटींची बोली लागली आहे. तर भारताबाहेरील खेळाडुंमध्ये गुजरात जायंट्सने 3.2 कोटी रुपयांची बोली लावून अॅशलेह गार्डनर हिची खरेदी केली. तसेच दीप्ती शर्माची 2.6 कोटींची बोली लावून युपी वॉरिअर्सने खरेदी केली.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंन्शन सेंटरमध्ये महिलांच्या आयपीएलच्या पहिल्या सिझनसाठी लिलाव प्रक्रिया सुरू झाली. महिलांची आयपीएल स्पर्धा 4 ते 26 मार्च या दरम्यान होणार आहे. आतापर्यंत 26 खेळाडुंवर 39.65 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मानधनासाठी 3.40 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केली.
टॉप बोली मिळालेले खेळाडू
भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला नीता अंबानी यांची मालकी असलेल्या मुंबई इंडियन्सने 1.8 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. तर अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमची कॅप्टन शेफाली वर्मा हिला दिल्ली टीमने 2 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले.
- सोफी एक्लेस्टोन युपी वॉरिअर्सने 1.8 कोटी रुपयांची बोली
- एली पेरी रॉयल चॅलेजर्स बंगळुरू 1.7 कोटी रुपयांची बोली
- पूजा वस्त्रकारला मुंबई इंडियन्सने 1.9 कोटी
- रिचा घोष रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 1.9 कोटी
- यास्तिका भाटिया मुंबई इंडियन्स 1.5 कोटी
- शबनिम इस्माईल युपी वॉरिअर्स 1 कोटी
- राजेश्वरी गायकवाड युपी वॉरिअर्स 40 लाख
- अंजली सारवाणी युपी वॉरिअर्स 70 लाख
- अलिसा हिली युपी वॉरिअर्स 70 लाख
- वेस्ट इंडिजची ऑलराउंडर डिआंड्रा डॉटिन गुजरात जाएंट्स 60 लाख
- हरलीन देओल गुजरात जाएंट्स 40 लाख
- ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलॅण्ड गुजरात जाएंट्स 70 लाख
- शिखा पांडे दिल्ली कॅपिटल्स 60 लाख
- राधा यादव दिल्ली कॅपिटल्स 40 लाख