Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Note Exchange: दोन हजारांची नोट अजूनही बदलून मिळू शकते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2000 Note Exchange

Image Source : www.twitter.com

2000 Note Exchange: दोन हजारांची नोट बदलून घेण्याची डेडलाईन संपली आहे. पण अजूनही तुमच्याकडे दोन हजारांची नोट आहे आणि ती बदलायची असेल, तर जाणून घ्या ही प्रक्रिया.

2000 Note Exchange: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2023 मध्ये 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या नोटा बदलून देण्यासाठी ग्राहकांना 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर आरबीआयने पुन्हा एकदा 7 दिवसांचा कालावधी वाढवून दिला. पण अजूनही अनेक जणांनी 2 हजारांच्या नोटा बदलून घेतलेल्या नाहीत. त्यांना त्या आताही बदलून मिळू शकतात.

12,000 कोटी मूल्याच्या नोटा मार्केटमध्ये

आरबीआयने केलेल्या आवाहनानंतर अनेकांनी बँकेत, आरबीआयकडे, पोस्टात जाऊन दोन हजारांच्या नोटा बदलून घेतल्या होत्या किंवा त्या मार्केटमध्ये वापरल्या. आरबीआयने दिलेली दुसरी डेडलाईनही संपली आहे. तरीही अजून बऱ्याच नोटा आरबीआयकडे जमा झालेल्या नाहीत. जवळपास 12,000 कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे पोहोचलेल्या नाहीत. इतक्या मोठ्या संख्येने नोटा जर मार्केटमध्ये असतील तर त्या आरबीआयकडे जमा होणे गरजेचे आहे. आरबीआयने याबाबत लवकरात लवकर 2 हजाराच्या नोटा जमा कराव्यात, असे आवाहन केले.

बँकेतील काऊंटर बंद

आरबीआयने दिलेल्या मुदतीनुसार, देशातील सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा बदलून मिळत होत्या. पण आता बँकेने नोटा बदलून देण्याचे काऊंटर आरबीआयच्या निर्देशानुसार बंद केले. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मार्केटमध्ये 2000 रुपयांच्या एकूण 2.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा उपलब्ध होत्या. त्यातील बऱ्यापैकी नोटा आरबीआयकडे पुन्हा आल्या आहेत. त्यातील अजून 12,000 कोटी रुपयांच्या नोटा मार्केटमध्येच आहेत.

इथे करा 2 हजाराच्या नोटा जमा

आरबीआयने 2 हजारांची नोट बदलून घेण्याची नियमित डेडलाईन संपल्यानंतर देशभरातील फक्त 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या नोटा बदलून घेण्याची सुविधा सुरू ठेवली आहे. या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मुंबई, बेलापूर,नागपूर, बंगळुरु, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, गुवाहटी, जयपूर, कानपूर, जम्मू, लखनऊ, पटना आणि तिरुअनंतपुरम यांचा समावेश आहे. याशिवाय काही निवडक पोस्ट ऑफिसमधून या नोटा बदलून देण्याचे काऊंटर सुरू ठेवले आहे.