Salmon demand growing in India: सामन (Salmon) माशाच्या मागणीत तब्बल 20 टक्क्यांनी वाढ होत आहे. या माशाचे सेवन करोनाकाळापासून वाढले आहे, तेव्हापासून आतापर्यंत यात दरवर्षी 10 टक्क्यांची वाढ झाली आहे, असे मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ई-कॉमर्स लॉजिस्ट परिषदेत (E-Commerce Logistics Summit) नॉर्वे सी फूडचे (Norway Seafood) व्यवस्थापकीय संचालक मार्क अल्झावाहरा यांनी सांगितले.
सामन (Salmon) म्हणजे रावस, मात्र रावसला जगभरात भारतीय सामन (Salmon) म्हणून ओळखले जाते. सामन (Salmon) माशाच्या वाढत्या मागणीमुळे, भारत इतर देशांमधून सामन (Salmon) मासे आयात करतो. जपान, युके, नॉर्वे, इटली, चिली, ह़ाँगकाँग आदी देशांमधून मुख्यत्वे आयात केली जाते. 2022 मध्ये भारत जगातला तिसरा देश ठरला, जो सर्वाधिक सामन (Salmon) मासे आयात करतो. प्रीझर्व्ह मासे आणि ताजे मासे असे दोन प्रकार आयात केले जातात. सध्या 2020 च्या तुलनेत तब्बल 99 टक्क्यांनी आयात होतहोती, तर 2021 मध्ये 68 टक्के आयात होतहोती. सध्या ताज्या माशांच्या आयातीत 36.9 टक्क्यांनी घट झाली आहे. तर, यंदा प्रीझर्व्ह माशांच्या आयातीत 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, भारतात प्रीझर्व्ह स्टेशन 12 टक्क्यांनी वाढले आहे, ही सर्व माहिती नुकत्याच सादर झालेल्या वोल्झाच्या इंडिया इम्पोर्ट अहवालात (Volza's India Import data ) नमूद करण्यात आलेली आहे.
सामन (Salmon) माशाच्या मागणीत वाढ का झाली? Why has the demand for salmon increased?
भारतात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर, सुरुवातील राज्य सरकारकडून चिकन, मटण, अंडी खाण्याबाबत सावधानता बाळगण्यास सांगितले होते. तसेच सर्वत्र हेल्थी इटींगचे प्रमोशन केले जात होते. परदेशातून, जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Center) आरोग्याची काळजी कशी घ्यावी, काय करावे, काय करू नये आदींबाबत गाईडलाईन्स येत होत्या. यावेळी अनेक हेल्थ एक्स्पर्ट, न्युट्रीशिनिस्ट, हेल्थ इन्फ्ल्युएन्सर मासे खाण्याचा सल्ला देत होते. त्यात हेल्थी मासा म्हणजे सामन (Salmon) मासा!आताही गुगलवर हेल्थी मासा कोणता हे सर्च केल्या त्यात सामन (Salmon) मासा टॉपवर आहे. करोनाकाळात सामन (Salmon) मासा खाण्याचे प्रमाण वाढण्यामागे हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. नवनवीन परदेशी डाएट दरवर्षी येत असतात, त्यातूनच सामन (Salmon) मासा खाण्यात वाढ झाली आहे. ग्रील डाएटमध्ये मुख्यत्वे सामन (Salmon) मासे खाण्यास सांगितले जाते.
सामन (Salmon) हा व्हर्सटाईल मासा असल्यामुळे याचे अनेक पदार्थही बनतात, हे मासे सहज उपलब्ध होतात, तसेच यात फार काटेह नसतात यामुळे हा मासा आधीपासूनच प्रसिद्ध होता. तसेच अनेक इंटरनॅशनल कुकींग शो, सोशल मिडियावरील इन्फ्ल्युएन्सर कुक्सही सामन (Salmon) माशांचे भन्नाट प्रकार दाखवत असल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये या माशाला मागणी वाढली, असे अल्झावाहरा यांनी ई-कॉमर्स लॉजिस्ट परिषदेत म्हटले.