सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, दसरा. दिवाळी, ईद आणि ख्रिसमस असे सण लागोपाठ येणार असल्यामुळे बाजारपेठा देखील फुलल्या आहेत. यंदाच्या या उत्सव काळात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित कंपन्यांनीही चांगली विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत Redseer आणि Deloitte या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला आहे. यानुसार यंदाच्या उत्सवी काळात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात सुमारे 18-20 टक्के वाढ अपेक्षित आहे. भारतात सणासुदीच्या निमित्ताने नवनवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. शुभ मुहूर्तावर नव्या कुठल्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. दरवर्षीचा हा अंदाज लक्षात घेता भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करू शकतात.
मिळतेय धमाकेदार ऑफर
फ्लिपकार्ट, अमेझॉन, विजय सेल्स आदी कंपन्यांनी त्यांच्या पोर्टलवर वेगवेगळ्या ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. अमेझॉन Great Indian Festival sale नावाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सेल लाइव करणार असून, फ्लिपकार्ट देखील Big Billion Day Sale साजरा करणार आहे. या दोन्ही सेलमध्ये ग्राहकांना 50 ते 70 टक्के सवलत देण्याची शक्यता आहे.
This festive season, shop all you want, and pay how you can. Pick from your favourite brands in fashion, electronics, mobile phones, home & kitchen, with No Cost EMI for up to 36 months. Only on #AmazonGreatIndianFestival, coming soon.#OpenBoxesOfHappiness pic.twitter.com/xJGB8O8U5r
— Amazon India (@amazonIN) September 25, 2023
स्मार्ट फोन आणि स्मार्ट टीव्हीवर जोर
आतापर्यंतचा विक्रीचा अंदाज लक्षात घेता बहुतांश ग्राहक स्मार्ट फोन आणि स्मार्ट टीव्ही खरेदीवर जोर देत असतात. यंदाच्या सेलमध्ये देखील स्मार्ट फोन आणि स्मार्ट टीव्हीची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची चिन्हे आहेत. ॲपलने आयफोन 15 विक्रीला आणल्यानंतर देशभरात त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते आहे.
वेगवगेळ्या ई-कॉमर्स वेबसाईटवर सध्या आयफोनच्या खरेदीसाठी खरेदीदारांची झुबंड उडालेली दिसते आहे. याशिवाय फ्रीज, वाशिंग मशीन, साउंड सिस्टम, मिक्सर, आदी इलेक्ट्रोनिक्स सामानावर देखील कंपन्या भरघोस सवलत देत आहे.