Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

10,000 Bitcoin Pizza : गोष्ट आहे 10 हजार बिटकॉईन्सच्या 2 पिझ्झाची!

10,000 Bitcoin Pizza

10,000 Bitcoin Pizza : फ्लोरिडामधल्या एका व्यक्तीने 2 पिझ्झांसाठी 10 हजार बिटकॉईन म्हणजेच आजच्या किमतीत 1742.66 कोटी रुपये दिले होते. अशक्य वाटणारी ही गोष्ट 2010 मध्ये प्रत्यक्ष घडलेली आहे.

तुम्ही दोन पिझ्झासाठी 1742 करोड रुपये द्याल का? हा प्रश्न ऐकून तुमच्या मनात, “ही कसली फालतुगिरी आहे?, सोन्याच्या भांड्यात जरी हे पिझ्झा बनवले तरी यांची किंमत 1742 करोड कधीच होणार नाही’’, असे काही विचार नक्कीच तुमच्या मनात आले असतील. पण अशक्य वाटणारी ही गोष्ट 2010 मध्ये प्रत्यक्ष घडलेली आहे.

 फ्लोरिडामधल्या एका व्यक्तीने 2 पिझ्झांसाठी 10 हजार बिटकॉईन (10,000 Bitcoin) म्हणजेच आजच्या किमतीत 1742.66 कोटी रुपये दिले होते. चला तर जाणून घेऊयात काय आहे; 10 हजार बिटकॉईनच्या 2 पिझ्झाची गोष्ट.

बिटकॉईनटॉक या सिस्टिमवर, लॅस्झलो हॅनयेझ (Laszlo Hanyecz) या माणसाने पापा जॉन्स (Papa John's Pizza) या कंपनीच्या दोन पिझ्झाच्या बदल्यात 10 हजार बिटकॉईन देण्याचे मान्य केले होते. बिटकॉईनटॉक (Bitcoingtalk) हा बिटकॉईन फोरम (Bitcoin Forum) आणि क्रिप्टो फोरम (Crypto Forum) आहे. जिथे ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉईनशी (BTC) संबंधित माहितीची देवाणघेवाण केली जाते. या विषयाशी संबंधित माहिती मिळवण्याचा बिटकॉईनटॉक हा मुख्य स्त्रोत होता. तर या सिस्टिमवरून लॅस्झलो हॅनयेझ याने दोन पिझ्झांसाठी 10 हजार बिटकॉईन ऑफर केले होते. बिटकॉइनटॉकची सुरूवात आणि स्थापना 2009 मध्ये सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) यांनी केली होती. नाकामोटो यांनीच बिटकॉईन विकसित केला होता. 


लॅस्झलो हॅनयेझ याने पिझ्झासाठी बिटकॉइनटॉकवर पुढीलप्रमाणे मॅसेज टाकला होता. त्याने म्हटले होते की, “मी दोन पिझ्झासाठी 10 हजार बिटकॉईन्स देईन. या दोन मोठ्या पिझ्झामुळे माझ्याकडे दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी पिझ्झा शिल्लक राहील. मला उरलेला पिझ्झा दुसऱ्या दिवशी खायला आवडतो. तुम्ही स्वतः मला पिझ्झा तयार करून देऊ शकता का? किंवा कोणत्याही डिलेव्हरी शॉपमधून माझ्यासाठी तो ऑर्डेर करू शकता का? पण मी पिझ्झाच्या बदल्यात तुम्हाला फक्त बिटकॉईन देऊ शकतो”.

हॅनयेझ यांची ही अफलातून ऑफर एक ब्रिटिश माणूस स्वीकारतो आणि तो हॅनियेझ यांच्या घरी 2 पिझ्झांची डिलेव्हरी करतो. त्याबदल्यात हॅनियेझ त्या ब्रिटिश माणसाला 10 हजार बिटकॉईन देतात. हॅनियझ यांनी 25 डॉलर्सच्या 2 पिझ्झांसाठी 10 हजार बिटकॉईन दिले. ज्याची तेव्हा किंमत 41 डॉलर्स होती. त्यावेळी हॅनियेझ यांना बिटकॉईनचे मूल्य लक्षात आले नव्हते. त्यावेळी त्यांनी बिटकॉईनला कमी लेखल्याने त्यांचे करोडो डॉलर्सचे नुकसान झाले होते. हा किस्सा 22 मे रोजी बिटकॉईन पिझ्झा या मथळ्यांतर्गत क्रिप्टोमार्केटमध्ये प्रसिद्ध झाला. त्यामुळे 22 मे या दिवशी हा किस्सा Bitcoin Pizza Day म्हणून ओळखला जातो. यातील गंमतीचा भाग सोडला तर अपुऱ्या माहितीमुळे कसे नुकसान होऊ शकते. याचे हे उत्तम उदाहरण आहे. अशाप्रकारच्या कितीतरी घटना मार्केटमध्ये घडत असतात. अॅसेटचे (Asset) योग्य मूल्य आणि क्षमता न ओळखल्यामुळे नुकसान सहन करावे लागते. परिणामी गुंतवणूक करताना विचारपूर्वक आणि सर्व माहिती घेऊनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.