Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kawasaki W800 च्या खरेदीवर 1.25 लाखांची सूट, ऑफर लिमिट आणि डिटेल्स माहित करून घ्या

Kawasaki W800 offer

Image Source : http://www.kawasaki.com/

Kawasaki W800 offer: वर्षाच्या अखेर अनेक ऑटो मोटर्स कंपन्या खरेदीवर सूट देतात. म्हणून अनेक जण वर्षाच्या अखेरचं कार, बाइक खरेदी करण्याचा विचार करतात. Kawasaki W800 च्या खरेदीवर (Kawasaki W800 Discount offer) 1.25 लाखांची सूट देण्यात येत आहे, डिटेल्स माहित करून घ्या.

Kawasaki W800 offer: वर्षाच्या अखेर अनेक ऑटो मोटर्स कंपन्या खरेदीवर सूट देतात. म्हणून अनेक जण वर्षाच्या अखेरचं कार, बाइक खरेदी करण्याचा विचार करतात. Kawasaki W800 च्या खरेदीवर 1.25 लाखांची सूट देण्यात येत आहे. Kawasaki India ने भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या दोन बाईकवर भरघोस सूट देऊ केली आहे. कंपनीने त्यांच्या मिडलवेट मोटरसायकल Z650 आणि W800 साठी 'Good Times Vouchers' ची घोषणा केली आहे, याबद्दल अधिक माहिती घेऊया. 

 किती आहेत व्हाउचर? (How much are the vouchers?)

Kawasaki Z650 बाईक 35,000 च्या व्हाउचरसह उपलब्ध आहे, तर Kawasaki W800 1,25,000 च्या व्हाउचरसह उपलब्ध आहे. या व्हाउचरद्वारे  ग्राहक मोटारसायकलच्या एक्स-शोरूम किमतींवर डिस्काउंट  मिळवू शकतात. या ऑफरची लिमिट केवळ 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे. 

Kawasaki W800 किंमत आणि वैशिष्ट्ये (Kawasaki W800 Price and Features)

Kawasaki W800 ही एक क्रूझर बाईक आहे. ही बाईक भारतात 7.32 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. यात 773cc इंजिन आहे, जे 50.95 bhp पॉवर आणि 62.9 Nm टॉर्क जनरेट करते. समोर आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेकसह अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम आहे. बाईकचे वजन 224 किलो आहे आणि 15 लिटरची इंधन टाकी क्षमता आहे. अनेक भागांवर गोल हेडलाइट्स, वायर-स्पोक व्हील आणि क्रोम मिळतात. बाईकमध्ये एलईडी हेडलाइट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि असिस्ट आणि स्लिपर क्लच मेकॅनिझम सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. भारतीय बाजारपेठेत ही मोटरसायकल ट्रायम्फ स्ट्रीट ट्विन आणि रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 शी स्पर्धा करते.

काय आहे इतर ऑफर (Kawasaki Offer)

कावासकी कंपनीने दोन बाइकवर ऑफर जाहीर केली आहे. एक म्हणजे कावासकी निंजा 300 या बाइकवर कंपनीने 10 हजार रूपयांचा डिस्काउंट दिला आहे. तर दुसरी बाइक कावासकी झेड 650 या बाइकवर कंपनी चक्क 35 हजार रूपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे त्वरित या शानदार ऑफरचा लाभ घ्या व नवीन वर्ष आनंदात साजरे करा.