Beed District Farmer: बीड जिल्हयातील शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी अचानक 11 हजार ते 12 हजार रक्कम जमा झाली. ही रक्कम जवळजवळ बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आली. ही रक्कम चुकून ‘बजाज अलियान्झ’ या कंपनीकडून आली आहे, ती कशी व यामागे काय कारण आहेत, हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
चुकून कशी जमा झाली रक्कम (How the Amount was Deposited by Mistake)
ही रक्कम बीड जिल्ह्यातील ‘बजाज अलियान्झ’ (Bajaj Allianz) या कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. काही वर्षांपुर्वी पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना तो विमा परत देण्याची जबाबदारी या कंपनीकडे होती. मात्र याच विमा कंपनीच्या खात्यातून तब्बल 12 कोटी रुपये रक्कम बीड जिल्ह्यातील 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून जमा झाली आहे. विशेष म्हणजे, बीडच्या किसन म्हस्के या शेतकऱ्याच्या खात्यावर बजाज अलियान्झ या कंपनीकडून 11 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. हा मॅसेज आल्यानंतर तात्काळ त्यांनी ते पैसे काढून घेतले. आता ही चुकून आलेली रक्कम जरी त्यांच्या खात्यावर जमा झाली असली, तरी ती परत करण्यास त्यांनी नकार दिला आहे.
12 कोटी रुपये करा वसूल (12 Crore Collection)
बीड जिल्हयातील विविध शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 11ते 12 हजारच्या स्वरूपात 12 कोटी जमा झाल्याची चुक बजाज अलियान्झ या कंपनीच्या लक्षात येताच, कंपनीने बँकेला पत्र पाठवले आणि हे 12 हजार शेतकऱ्यांकडून 12 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहे.
शेतकऱ्यांची यावर प्रतिक्रिया (Farmer Feedback)
बीडमधील शेतकऱ्यांना बँकेकडून हा आदेश मिळताच शेतकऱ्यांनी कंपनीचा दावा फोल असल्याचे सांगितले आहे. नुकसानीपोटी भरलेली विम्याची ही रक्कम असून, यातील एक रुपयादेखील कंपनीला परत करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
बँकेचा निर्णय (Bank Decision)
बँकेने शेतकऱ्यांना सांगितले की, बजाज अलियान्झ कंपनीकडून आलेले पैसे शेतकऱ्यांनी पुन्हा बँकेत जमा केले नाही, तर बँक शेतकऱ्यांच्या अकाउंटला होल्ड करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर बँकेकडून जमा झालेली रक्कम परत करावी.