Agri Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळाले आहे, हे आपण दहा मुद्दयात सोप्या व सविस्तर भाषेत समजावून घेवुयात. जे की तुम्हाला कळण्यास सहज व सोपे जाईल.
1. भारताला बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्याची घोषणा, भरड धान्य उत्पादन वाढीवर देण्याच्या हेतूने ‘श्री अन्न योजना’ सुरू करण्यात येणार आहे.
2. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी नैसर्गिक खतांच्या साहाय्याने ‘गोबर धन योजना’ सुरू करण्याची घोषणा.
3. 'PM PRANAM' कार्यक्रम करणार सुरू, जेणेकरून खतांच्या पर्यायी स्रोतांना प्रोत्साहन मिळेल.
4. कृषी संबंधित स्टार्टअपसाठी ‘अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड’ सुरू करण्यात येणार आहे.
5. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायांच्या विकासासाठी कृषी कर्ज 20 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
6. पुढील तीन वर्षांत नैसर्गिक शेती करणाऱ्या एक कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार.
7. मस्त्यपालन उपयोजनेअतंर्गत 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
8. कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘पीपीपी मॉडेल’ अंतर्गत मोठे प्रयत्न केले जाणार.
9. फळ बागांचे उत्पादन वाढविण्यासाठी 2200 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
10. दहा हजार ‘बायो इनपुट रिसर्च सेंटर्स’ची स्थापन करण्यात येणार आहे.