Best Mid cap Mutual Funds: म्युच्युअल फंडच्या शेकडो योजना बाजारात आहेत. इक्विटीमध्ये जास्त तर डेट योजनांमध्ये कमी जोखीम असते. सर्वसामान्यपणे मीड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांना प्रगती करण्याची मोठी संधी असते. त्यासोबत जोखीमही येते. 10 मिडकॅप फंड्स ज्यांनी मागील एक वर्षात सर्वाधिक परतावा दिल्या त्या योजना कोणत्या पाहू.
सर्वप्रथम मिड कॅप फंड म्हणजे काय हे जाऊन घेऊया. मिड कॅप म्युच्युअल फंड योजना अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात ज्यांचे भांडवल मध्यम स्वरुपाचे असतात. या कंपन्या आकाराने रिलायन्स, टाटा सारख्या बलाढ्यही नसतात आणि अत्यंत छोट्याही नसतात. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने या कंपन्यांना जास्त संधी असतात. एसएमसी फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीने टॉप मिड कॅप फंडची माहिती दिली आहे.
टॉप मिड कॅप फंड योजना
1) एचडीएफसी मीड कॅप अपॉर्च्युनिटी ग्रोथ फंडने एक वर्षात 35.20% इतका परतावा दिला.
2)क्वांट मीड कॅप ग्रोथ फंडाने एक वर्षात 27.50% परतावा दिला.
3) निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने एक वर्षात 27.40% परतावा दिला.
4) मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड 26.80% परतावा.
5) महिंद्रा मनुलाइफ मिड कॅप फंड 26% परतावा.
6) टाटा मिड कॅप ग्रोथ फंड 24.10 टक्के परतावा.
7) इनव्हेस्को इंडिया मिडकॅप फंडाने 23.70% परतावा दिला.
8) फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंडने 23.50% परतावा दिला.
9)एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंडने 22.60% परतावा दिला.
10) सुंदरम मिड कॅप फंडने 22.60% परतावा दिला.
कोणत्याही मुच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना दीर्घकालीन परतावा पाहायला हवा. अल्प कालावधीत चांगला परतावा देणारी योजना दीर्घकालावधीत चांगला नफा मिळवून देईल असे नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना सेबी अधिकृत सल्लागाराची मदत घ्या. गुंतवणुकीचे ध्येय, जोखीम घेण्याची क्षमता, कालवधी, अशा अनेक गोष्टी गुंतवणूक करताना महत्त्वाच्या ठरतात.