Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Calculator: रिटायरमेंटनंतर 10 कोटी रुपये हवेत; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांची SIP करावी लागेल

SIP Calculator FOR 10 Crore Retirement Fund

Image Source : www.msn.com

SIP Calculator: निवृ्त्तीसाठी निश्चित रकमेचा फंड निर्माण करायचा असेल, तर लवकरात लवकर आणि कमीत कमी गुंतवणूक करून चांगला फंड उभा करता येऊ शकतो. यासाठी एसआयपी ही गुंतवणुकीची साधीसोपी पद्धत फायद्याची ठरू शकते.

SIP Calculator: नोकरीतून रिटायर्ड झाल्यानंतर प्रत्येकाची अपेक्षा असते, एक आपल्याकडे पुरेसा फंड असावा. जेणेकरून आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक होईल. पण त्यासाठी सुरुवातीपासून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला निवृत्तीनंतर 10 कोटी रुपयांचा निधी हवा असेल तर त्यासाठी सुरूवातीपासून किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, हे ठरवणे गरजेचे आहे. त्यात तु्म्ही कोणत्या योजनेमध्ये पैसे टाकणार आहात, हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग जाणून घेऊयात निवृत्तीनंतर 10 कोटी रुपयांचा निधी कसा मिळवायचा.

निवृत्तीसाठी 10 कोटी रुपयांचा फंड हवा

निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने जगावे, असे म्हटले जाते. पण हे सुख आपल्याला सहजासहजी मिळत नाही. यासाठी आपल्यालाच तरुण वयात तरतूद करून ठेवावी लागते. नाहीतर निवृत्तीनंतरचे आयु्ष्य हे खडतर वाटू लागते. निवृत्तीनंतरचे जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल त्याची तरतूद आताच करणे गरजेचे आहे. आज आपण निवृत्तीपर्यंत 10 कोटी रुपयांचा निधी कसा निर्माण करू शकतो, ते समजून घेणार आहोत. यासाठी म्युच्युअल फंडमधील एसआयपी ही गुंतवणुकीची पद्धत वापरली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

SIP Calculator आणि गुंतवणुकीचे नियोजन

एसआयपी कॅल्क्युलेटरमध्ये (SIP Calculator) दाखवले जाते त्यानुसार, वयाच्या 25 व्या वर्षापासून एसआयपीद्वारे प्रत्येक महिन्याला 15,000 रुपयांची गुंतवणूक केली तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत त्याच्याकडे 12 टक्क्यांच्या व्याजदरानुसार नक्कीच 10 कोटी रुपयांचा निधी जमा होईल. म्युच्युअल फंडमधील असे बरेच फंड आहेत की, त्यांनी मागील 15 वर्षांत 12 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्यामुळे जितक्या लवकरात लवकर गुंतवणूक सुरू केली जाईल. तसेच ती योग्य फंडमध्ये केली तर नक्कीच एवढ्या कालावधीत मोठा निधी निर्माण होऊ शकतो.

वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना वयाच्या निवृत्तीपर्यंत जर 10 कोटी रुपयांचा निधी उभारायचा असेल. कोणत्या वयापासून किती रुपयांची एसआयपी सुरू करावी लागेल, हे आपण जाणून घेणार आहोत.

लवकरात लवकर गुंतवणूक हाच खरा कानमंत्र!

वयाच्या 25 व्या वर्षापासून तुम्ही जर गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला वयाची साठी पूर्ण करताना 10 कोटी रुपयांचा निधी उभारायचा असेल तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 15,396 रुपयांची एसआयपी करावी लागेल. यासाठी व्याजदराचा परतावा 12 टक्के गृहित धरला आहे.

त्याचप्रमाणे वयाच्या 30 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केल्यास प्रत्येक महिन्याला 28,329 रुपये, तर 35 व्या वर्षी 52,697 रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवावे लागतील. अर्थात यासाठीचा व्याजदराचा दर हा 12 टक्केच गृहित धरला आहे. त्याचप्रमाणे वयाच्या 40 वर्षी 1,00,085 रुपये आणि 45 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करत असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,98,196 रुपये म्हणजेच जवळपास 2 लाख रुपये गुंतवल्यानंतर निवृत्तीनंतर 10 कोटी रुपये मिळू शकतील.

त्यामुळे निवृ्त्तीसाठी निश्चित रकमेचा फंड निर्माण करायचा असेल, तर लवकरात लवकर आणि कमीत कमी गुंतवणूक करून चांगला फंड उभा करता येऊ शकतो. यासाठी एसआयपी ही गुंतवणुकीची साधीसोपी पद्धत फायद्याची ठरू शकते.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)