2022-23च्या अर्थसंकल्पाचा भाग म्हणून या वर्षी अधिसूचित केलेल्या ITR-U या नव्याने सादर केलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्मचा सुमारे 1 करदात्यांनी लाभ घेतला. यातून सरकारकडे सरकारकडे 28 कोटी रुपयांचा टॅक्स जमा झाला आहे. ITR-U या फॉर्मचा अर्थ इन्कम टॅक्स रिटर्न-अपडेटेड असा होतो. करदाते 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षाचे किंवा 2021-21 आणि 2021-22 या असेसमेंट वर्षाचे सुद्धा अपडेटेड रिटर्न (ITR-U) भरू शकतात.
अपडेटेड रिटर्न म्हणजे काय?
इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 139 (8 अ) मध्ये अद्ययावत / सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax) भरण्याची तरतूद उपलब्ध आहे. इन्कम टॅक्स कायद्यात करण्यात आलेल्या नवीन तरतुदींमुळे करदात्याला रिटर्न फाईल करताना काही त्रुटी राहिल्यास किंवा त्यात काही चूका झाल्यास ती दंड भरून सुधारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संबधित करदात्याला मुदत संपल्यानंतर दंड भरून 2 वर्षांच्या आत सुधारित आयटीआर रिटर्न भरता (ITR U form online) येऊ शकते.
ITR-U कशासाठी?
अपडेटेड रिटर्न फॉर्म करदात्यांना संबंधित असेसमेंट वर्ष संपल्यानंतर 2 वर्षांच्या आता भरता येऊ शकते. ज्यांना आपल्या उत्पन्नात बदल करायचे आहेत; ते योग्य कारणे नमूद करून त्यात बदल करू शकतात. तसेच ज्यांनी यापूर्वी परतावा दाखल केला नसेल किंवा उत्पन्नाची माहिती योग्यरीत्या नोंदवली नसेल, किंवा चुकीचा आयटीआर फॉर्म निवडला गेला असेल, असे करदाते आयटीआर-अपडेटेड फॉर्म भरू शकतात.
अपडेटेड आयटीआरचा फायदा
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना करदात्यांकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या ITR-U फॉर्म भरून सुधारता येतात. या सुधारणा सीबीडीटी (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) करून मान्य झाल्यास करदात्यावर होणारी कारवाई टाळली जाते. लॉटरी किंव सट्टा खेळणाऱ्यांनाही ITR-U फॉर्म भरता येतो. ऑनलाईन गेम, लॉटरी किंवा सट्टेबाजीतून मिळवलेले उत्पन्न अपडेट करून करदाते इन्कम टॅक्स विभागाच्या कारवाईतून मुक्त होऊ शकतात.
सीबीडीटीने प्रसिद्ध केलेल्या माहिती अनुसार, इन्कम टॅक्स विभागाने आतापर्यंत 93 हजार कोटी रूपयांचा परतावा करदात्यांना दिला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 78 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्यावर्षी 52 हजार कोटी रुपयांचा परतावा विभागाकडून देण्यात आला होता.